VIDEO: भाजपाला कोरोना झाला म्हणून सत्तेवरून गेली; पाप केलं की कोरोना होतो; संजय राऊतांची जहरी टीका

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपला कोरोना झाला म्हणून सत्तेवरून गेली. पाप केलं की कोरोना होतोच. (sanjay raut)

VIDEO: भाजपाला कोरोना झाला म्हणून सत्तेवरून गेली; पाप केलं की कोरोना होतो; संजय राऊतांची जहरी टीका
sanjay raut
Follow us
| Updated on: Sep 04, 2021 | 7:08 PM

पुणे: शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपला कोरोना झाला म्हणून सत्तेवरून गेली. पाप केलं की कोरोना होतोच, अशी जहरी टीका संजय राऊत यांनी केली आहे. (sanjay raut attacks BJP over alliance in maharashtra)

शिवसेना नेते संजय राऊत हे आज राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या खेडमध्ये आहेत. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी ही टीका केली. यावेळी तलवार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसे खेड तालुक्त्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

भाजपला कोरोना झाला म्हणून भाजप सत्तेतून बाहेर गेली. पाप केलं की कोरोना होतोच, असं राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना मास्क घालण्याचं आवाहन केलं. तुम्ही मास्क नाही घातलं तर उद्धव ठाकरे आपली चंपी करतील. आधी माझी चंपी करतील. नंतर तुमचं नाव घेऊन फटकारतील. कोरोनाची युती होऊ शकत नाही, तुला मंत्रीपद देतो, महामंडळ देतो असं चालत नाही. मुख्यमंत्री आपले आहेत. सांगतायेत नियम पाळाय. कोरोना कुठूनही घुसतो, असं ते म्हणाले.

भाजपकडून युतीत गद्दारी

आम्ही कोणाच्या वाट्याला जात नाही. आज पोलीस आमचे कार्यकर्ते उचलत आहेत. उद्या आम्ही त्यांना उचलू. आमचा राजकारणातील तो पिढीजात धंदा आहे. राजकीय कार्यकर्त्यांनी सूड उगवायचं सोडायचं नसतं,. भाजपाच्या माणसानं एक माणूस उभा केला. भाजपानं युतीतही गद्दारी केली, अशी टीकाही त्यांनी केली. भाजपनं युतीतही गद्दारी केली. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर गेलो. तुम्ही आमचे उमेदवार पाडत राहिलात. आम्ही तुमचं सरकार पाडलं, असा हल्लाही त्यांनी चढवला.

तर दिलीप मोहिते-पाटील घरी जातील

थोडी शिस्त आणली की दिलीप मोहिते-पाटील घरी जातील. आपण भल्याभल्यांना अंगावर घेतलंय, असं सांगत राऊतांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला डिवचलं आहे. सत्ता हा आमचा आत्मप्राण नाही. खेडमध्ये जे राजकारण झालं ते गलिच्छ होतं. विद्यमान आमदारांना थोडी तरी माणुसकी असती तर असं घाणेरडं राजकारण केलं नसतं. आघाडी सरकारमध्ये विषय बसून सोडवले जातात. मात्र हे आमदार महाशय आपल्याच चालीने चालत आहेत. पण जे काही घडलंय त्याची नोंद ठेवलीये, असा इशाराही त्यांनी दिला. खेडमध्ये पुढचा आमदार हा शिवसेनेचाच असेल, असंही त्यांनी सांगितलं.

किड्यांचा बंदोबस्त करू

महाराष्ट्रात आघाडीचा धर्म आपण पाळला पाहिजे. तिघांचा शत्रू एकच आहे. सरकारचे मार्गदर्शक शरद पवार आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. मात्र खेडमधले जे कीडे वळवळतायेत त्यांचा आम्ही बंदोबस्त आम्ही करू, असंही त्यांनी ठणकावलं. (sanjay raut attacks BJP over alliance in maharashtra)

संबंधित बातम्या:

राजू शेट्टींनी राष्ट्रवादी विरोधात शड्डू ठोकलाय? पवारांच्या स्पष्टीकरणानंतर राजू शेट्टी काय म्हणाले वाचा

महाराष्ट्रातच नाही इतर राज्यातही ईडीचा गैरवापर, विरोधकांना नमवण्याचा केंद्राचा प्रयत्न; शरद पवारांची टीका

VIDEO: राज्यातील भाजप नेत्यांनी तरी तारतम्य पाळायला हवं होतं; मंदिर आंदोलनावरून शरद पवारांनी फटकारले

(sanjay raut attacks BJP over alliance in maharashtra)

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.