भाजपचा पुण्यात फिरकू न देण्याचा इशारा, संजय राऊत थेट वडगाव शेरीत मेळावा घेणार, नेमकं काय घडणार?
शिवसेना खासदार संजय राऊत आज पुण्यात जाणार आहेत. वडगाव शेरीत मेळावा घेत संजय राऊत उद्या भाजपला आव्हान देणार आहेत. कोथळा काढण्याच्या वादग्रस्त वक्तव्यावरून संजय राऊत यांना पुण्यात फिरू देणार नसल्याचा इशारा भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला होता
पुणे: शिवसेना खासदार संजय राऊत आज पुण्यात जाणार आहेत. वडगाव शेरीत मेळावा घेत संजय राऊत उद्या भाजपला आव्हान देणार आहेत. कोथळा काढण्याच्या वादग्रस्त वक्तव्यावरून संजय राऊत यांना पुण्यात फिरू देणार नसल्याचा इशारा भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला होता, त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत थेट जगदीश मुळीक यांच्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आहेत. संजय राऊतांच्या पुणे दौऱ्यावर भाजप काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे.
संजय राऊत थेट जगदीश मुळीक यांच्या मतदारसंघात
संजय राऊतांनी कोथळा बाहेर काढण्याचं वक्तव्य केलं ते निषेधार्ह आहे, त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या विरोधात डेक्कन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करत अटक करण्याची मागणी जगदीश मुळीक यांनी केली होती. माजी आमदार जगदीश मुळीक यांचा वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ आहे.संजय राऊतांना पुण्यात फिरु न देण्याचं आव्हान मुळीक यांनी दिलं होतं. संजय राऊत आज वडगाव शेरीत सेना कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. भाजप आज नेमकं काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
जगदीश मुळीक नेमकं काय म्हणाले होते?
वादग्रस्त विधानाबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक होते तर मग कोथळा बाहेर काढण्याची धमकी देणाऱ्या संजय राऊत यांना वेगळा न्याय का? असा सवाल भाजपने विचारला होता. जोपर्यंत राऊतांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना पुण्यात फिरकू देणार नाही, असा इशारा भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला होता. त्यांनी राऊतांविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंदवत राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली होती.
संजय राऊतांना अडवून दाखवा, सेनेचंही आव्हान
शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांनी जगदीश मुळीक यांच्या विरोधात दंड थोपटले होते. संजय राऊत पुण्यात येणार, अडवूनच दाखवा असं आव्हान शिवसेनेनं भाजप नेत्यांना दिलं होतं. संजय राऊतांना अडविण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेना स्टाईलने भाजपला उत्तर देण्याचा इशारा शिवसेनेच्यावतीनं देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेची सभा ऑफलाईन
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सर्वसाधारण सभा ऑफलाईन अर्थात प्रत्यक्ष उपस्तिथीत घेण्यास राज्य सरकारने परवानगी दिलीय. कोरोना पार्शवभूमीवर या पूर्वी ऑनलाइन होत होत्या. मात्र, कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने सर्वसाधारण सभा ऑफलाईन घेण्यास परवानगी दिलीय. या पूर्वी विरोधकांनी ही ऑनलाइन सभा घेण्यास विरोध केला होता सत्ताधारी भाजप अनेक विषय चर्चा न करताच मंजूर करत असल्याचा आरोप करत विरोधकांनी अनेकदा गोंधळ घातला होता.
इतर बातम्या:
सव्वा रुपया असो की सव्वा कोटी, आत्मसन्मान महत्त्वाचा, मानहानीच्या दाव्यावरुन संजय राऊतांचं उत्तर
Saamana | महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरंही पेटतील, सामनातून राज्यपालांना थेट इशारा
Sanjay Raut today take Shivsena Party workers meeting at Pune BJP warning to oppose him