Pune rain : सासवड वीर लोणंद रस्ता वाहतुकीसाठी बंद, वीर धरणातून 42 हजार 933 क्युसेक पाण्याच्या विसर्गानंतर पूल पाण्याखाली

सासवडहून लोणंदला जाण्यासाठी किंवा वीर येथील श्री मस्कोबा नाथाच्या मंदिरात मोठ्या प्रमाणावर लोक या मार्गावरून दर्शनसाठी येत असतात. सातारा जिल्ह्यातील लोणंद भागातील लोक मोठ्याप्रमाणावर पुण्याकडे येण्यासाठी या पुलाचा वापर करतात.

Pune rain : सासवड वीर लोणंद रस्ता वाहतुकीसाठी बंद, वीर धरणातून 42 हजार 933 क्युसेक पाण्याच्या विसर्गानंतर पूल पाण्याखाली
वीर धरणातून पाण्याचा विसर्गImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 11:32 AM

पुणे : सासवड वीर लोणंद रस्ता (Saswad Veer Lonand road) वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गाने सध्या पूल पाण्याखाली गेला आहे. वीर धरणातून 42 हजार 933 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आला आहे. सासवडहून वीरमार्गे लोणंदला जाणाऱ्या मार्गावरच्या पुलावर मुसळधार पावसामुळे सध्या प्रचंड पाणी आले आहे. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वीर धरण 100 टक्के भरले आहे. धरणारून नीरा नदीत 42 हजार 933 क्युसेकने पाण्याचा विसर्ग (Water released) सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे वीर गावाजवळ असलेल्या नीरा नदीच्या पुलावर पाणी आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हा मार्ग बंद प्रशासनाकडून करण्यात आला आहे. या मार्गावरून न जाता पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पुरंदरच्या (Purandar) तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी केले आहे.

‘पर्यायी मार्गांचा वापर करावा’

सासवडहून लोणंदला जाण्यासाठी किंवा वीर येथील श्री मस्कोबा नाथाच्या मंदिरात मोठ्या प्रमाणावर लोक या मार्गावरून दर्शनसाठी येत असतात. सातारा जिल्ह्यातील लोणंद भागातील लोक मोठ्याप्रमाणावर पुण्याकडे येण्यासाठी या पुलाचा वापर करतात. त्यापार्श्वभूमीवर या मार्गावरून न येण्याचे आणि पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन आता प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. धरणसाखळी परिसरातही अतिवृष्टी होत असल्याने धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

वीर धरणातून पाण्याचा विसर्ग

जिल्ह्यातील इतर धरणांतूनही विसर्ग

पुण्याला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरणही भरले आहे. तर साखळी क्षेत्रातील इतर धरणे टेमघर, वरसगाव आणि पानशेत धरणदेखील 96 टक्क्यांच्या वर भरली आहेत. या धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. वीर धरणातूनही पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने दोन ठिकाणांना जोडणारे पूल पाण्याखाली गेले आहेत. मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे पाणीपातळीत आणखी वाढ होणार आहे. या पार्श्वभूमीवर नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....