पुणे : देशभरात मान्सून दाखल झाला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात कोकण अन् पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला आहे. हवामान विभागाने शनिवारी कोकणासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. परंतु त्यानंतर पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर कमी होणार आहे. मध्य महाराष्ट्रात आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यानंतर रविवार, सोमवारी यलो अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्यात कोणताही अलर्ट दिलेला नाही. विदर्भात पुढील पाच दिवस यलो अलर्ट दिला आहे.
राज्यात २५ जून रोजी मान्सून दाखल झाला. त्यानंतर विदर्भ वगळता इतर ठिकाणी समाधानकारक पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. विदर्भात अजून मोठ्या पावसाची गरज असल्याचे टि्वट पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसळीकर यांनी केले आहे.
1 -6 Jul पर्यंत राज्यातला पाउस.???
बहुतांश ठिकाणी समाधानकारक. विदर्भात मोठ्या पावसाची गरज. pic.twitter.com/8HXmGrAuWM— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 8, 2023
कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम घाट माथ्यावर धुंवाधार पाऊस सुरु आहे. पंचगंगेची पाणीपातळी 18 फुटांवर पोहचली आहे. राजाराम बंधाऱ्यासह सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला आहे. कोल्हापूरची तहान भागवणाऱ्या राधानगरी धरणात 35.56 टक्के पाणीसाठा झाला आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरुन वाहत आहे. राजाराम बंधाऱ्यासह शिंगणापूर, रुई, इचलकरंजी, सुर्वे, तेरवाड, शिरोळ हे ७ बंधारे पाण्याखाली गेले आहे. पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यावरून वाहतूक पूर्णपणे बंद आहे.
8 Jul, IMD GFS मोडेल नुसार, पुढच्या 4,5 दिवसात कोकणात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता. मध्यम सरी.⛅?☔?
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 8, 2023
पुण्यातील लोणावळ्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरलाय. गेल्या चोवीस तासांत 108 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेली चार दिवस लोणावळ्यात पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र शुक्रवारपासून पावसाने पुन्हा एकदा बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. गेल्या वर्षापेक्षा यंदा पावसाने उशीरा लावला असला तरी आजच्या दिवसापर्यंत 907 मिमी इतका पाऊस झाला आहे.