गेलेली सत्ता मिळविण्यासाठी केवीलवाना प्रयत्न, राहुल गांधी यांच्यावर सात्यकी सावरकर यांची टीका
राजकीय बंदीवानाला ज्या सुविधा असतात, त्या मिळाव्यात म्हणून त्यांनी पत्रव्यवहार केला.
पुणे – राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावरील वक्तव्य हे अत्यंत बेजबाबदार आहे. सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी म्हंटलं. यातून राजकीय स्वार्थ साधायचा आहे. सावरकर यांची बदनामी केली. हे वक्तव्य केल्यानंतर सावरकर प्रेमी, हिंदुत्ववादी सगळ्या संघटना पेटून उठल्या आहेत. यातून सावरकर यांचे फॅन्स तयार होणार आहेत. त्यामुळं एका बाजूला आनंद होतं आहे. तर दुसऱ्या बाजूला दुख होत आहेत. सारवकर यांच्याकडून आणखी स्फूर्ती मिळेल. अभ्यास करून सावरकर जगापुढं मांडावेत.
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत हे दाखविलं की, सावरकर हे इंग्रजांना माफी मागायचे. त्यांच्याकडून पेन्शन घ्यायचे. राहुल गांधी यांनी दाखविलेली पत्र खरी आहेत. पण, त्याला माफीनामा म्हणणं चुकीचं आहे.
सावरकर हे अंदमानात गेले होते. त्यावेळी त्यांना कुठल्याचं प्रकारच्या सुविधा पुरविल्या नव्हत्या. एका कोठडीत त्यांना बंद करून ठेवलं होतं. सामान्य बंदीवानाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी पत्र लिहिली होती, असंही सात्यकी सावरकर यांनी सांगितलं.
राजकीय बंदीवानाला ज्या सुविधा असतात, त्या मिळाव्यात म्हणून त्यांनी पत्रव्यवहार केला. त्यांनी फक्त माझी सुटका करा, असं म्हटलेलं नाही. बंगालचे क्रांतिकारक, गदर चळवळीचे लोकं जे अंदमान निकोबारमध्ये आहेत. त्यांना सोडा, असं म्हटलंय.
पेन्शन मिळविण्यासाठी सावरकर काय सरकारी नोकर होते का, असा सवाल सात्यकी सावरकर यांनी केला. यांना पेन्शन आणि निर्वाह भत्ता यातील फरक समजत नसल्याचं म्हटलं आहे.
काँग्रेसची सत्य गेलेली आहे. ती मिळविण्यासाठी राहुल गांधी हे असे आरोप करतात. हिंदुत्वविरोधी मतदारांवर त्यांचा डोळा आहे. त्यातही हा केवीलवाना प्रयत्न आहे, असा आरोपही सात्यकी सावरकर यांनी केला.