सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी प्रवेश प्रक्रिया सुरु, 22 ऑगस्टला ऑनलाईन परीक्षा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. पीएचडी प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले असून विद्यार्थ्यांना येत्या 31 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. पीएचडी प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले असून विद्यार्थ्यांना येत्या 31 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत. तर, पीएचडीची ऑनलाईन परीक्षा 22 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. विद्यापीठानं वेबसाईटवर यासंदर्भात अधिकृत नोटिफिकेशन जारी केली आहे. (Savitribai Phule Pune University Ph.D entrance exam notification released online application started soon)
पीएचडी ऑनलाईन परीक्षा 22 ऑगस्टला
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी प्रवेश परीक्षेसाठी 12 जुलैपासून नोंदणी सुरु होणार आहे. तर पात्र विद्यार्थी 31 ऑगस्टपर्यंत विद्यापीठाच्या वेबसाईटवर अर्ज दाखल करु शकतात. पीएचडीची प्रवेश परीक्षा सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी लॉग-इन केल्यानंतर विद्यार्थी २ तास परीक्षा देऊ शकतील. विद्यापीठातर्फे पीएचडी प्रवेश परीक्षा 22 ऑगस्ट रोजी घेतली जाणार असून या परीक्षेचा निकाल 24 ऑगस्ट रोजी जाहीर केला जाणार.
प्रवेश परीक्षेतून सूट कुणाला?
नेट, सेट, गेट, सीएसआयआर, आयसीएआर, डीबीटी आणि परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या पीएचडी प्रवेश परीक्षेसाठी सवलत देण्यात आली आहे. या उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे.
प्रवेश परीक्षा फी
प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुल्या प्रवर्गासाठी 1 हजार रुपये शुल्क असेल तर राखीव प्रवर्गासाठी 750 रुपये शुल्क भरावं लागणार आहे. तर, जे उमेदवार थेट मुलाखतीसाठी पात्र आहेत त्यांच्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 800 रुपये तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 600 रुपये शुल्क भरावं लागणार आहे. शुल्क ऑनलाईन पद्धतीनं जमा करावं लागणार आहे.
अर्ज कसा करायचा
स्टेप1: विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या http://bcud.unipune.ac.in/phd_entrance/application/login.aspx या लिकंला भेट द्यावी. अर्ज सादर करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी वेबसाईटवरील संपूर्ण जाहिरात आणि नोटिफिकेशन वाचून घेणे गरजेचे आहे.
स्टेप 2: विद्यार्थ्यांनी आवश्यक ती कागदपत्रं त्यांच्याकडे ठेवावीत
स्टेप3 : ईमेल आणि मोबाईल नंबरद्वारे लॉगीन करण्यासाठी नोंदणी करावी.
स्टेप4 : लॉगीन केल्यानंतर आवश्यक ती माहिती भरावी, फोटो आणि सही अपलो़ करावी. स्कॅन केलेली कागदपत्रं अपलोड करावीत आणि अर्ज सादर करावा.
स्टेप 5 : अर्ज सादर करताना आवश्यक ते परीक्षा शुल्क जमा करावं आणि अर्जाची प्रिंट आऊट पुढील कारणासाठी सोबत ठेवावी.
संबंधित बातम्या:
पुणे विद्यापीठाकडून परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, 12 जुलैपासून 6 लाख विद्यार्थी परीक्षा देणार
मोठी बातमी, कोरोनामुक्त भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार, ठाकरे सरकारकडून शासन निर्णय जारी
(Savitribai Phule Pune University Ph.D entrance exam notification released online application started soon)