pune : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उद्याही पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळांना सुटी

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उद्या पुणे (PUNE) आणि पिंपरी चिंचवडमधील सर्व शाळ बंद राहणार आहेत. यामध्ये महापालिकेच्या शांळासोबतच खासगी शाळांचा देखील समावेश आहे.

pune : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उद्याही पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळांना सुटी
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 2:49 PM

पुणे : सध्या पुणे (PUNE) आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) क्षेत्रात मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे.  दरम्यान पुढील दोन दिवसांत अतिवृष्टी होऊ शकते असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज पुणे आणि पिंपरी चिंडवडमधील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र पाऊस सुरूच असल्याने उद्या देखील शाळांना सुटी असणार आहे. उद्या पावसाचा अंदाज घेऊन निर्णय घेण्यात  येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पिंपरी चिंडवड क्षेत्रात उद्या शाळांना सुटी असल्याचे आदेश पिंपरी चिंडवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी काढले आहेत. पिंपरी चिंचवड क्षेत्रात सद्यास्थितीत मुसळधार पाऊस पडत असून, येत्या दोन दिवसांत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यामार्फत वर्तवण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रातील बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक तसेच सर्व खासगी शाळांना दिनांक 13  जुलै 2022 ते 14 जुलै 2022 पर्यंत सुटी रहाणार आहे. पावसाचा अंदाज घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असे आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

पुण्यातील शाळांनाही सुटी

पिंपरी चिंचवडच नाही तर पुण्यातील शाळांना देखील उद्या सुटी राहणार आहे. पुणे परिसरातही पाऊस सुरू आहे. त्यातच आता हवामान खात्याकडून पुढील दोन दिवसांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पुण्याती महापालिका तसेच खासगी शाळा उद्या बंद रहाणार आहेत. आजही शाळांना सुटी होती. उद्या पावसाचा अंदाज घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.  सतत पाऊस सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. तर काही रस्ते पाण्याखाली गेले आहेत.  तसेच नद्या आणि धरण्याच्या पाणीपातळीत देखील वाढ झाली आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यातील  आपत्कालीन परिस्थितीवर लक्ष – मुख्यमंत्री

राज्यात पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष असून, सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क आणि समन्वय ठेवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांना राज्यातील परिस्थितीबाबत सातत्यपूर्ण समन्वय ठेवण्याच्या निर्देश दिल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटले.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.