Ajit Pawar : प्रत्येक जिल्ह्यात सायन्स सेंटर सुरू करणार, अजित पवारांची घोषणा; सायन्स अॅन्ड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटरचं बारामतीत उद्घाटन

प्रत्येक मुलाला स्वतःचे सामर्थ्य कौशल्य ओळखण्यात समर्थन करणे आणि ज्ञान कौशल्य आणि मूल्याचा पाया मजबूत करणार. त्याबरोबरच रोजगार आणि व्यावसायिक कौशल्य यांच्या निर्मितीसाठी आणि भविष्यातील शिक्षणासाठी पुढे जाण्यास तयार करणे याला प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे, असे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar : प्रत्येक जिल्ह्यात सायन्स सेंटर सुरू करणार, अजित पवारांची घोषणा; सायन्स अॅन्ड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटरचं बारामतीत उद्घाटन
अजित पवार Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 12:52 PM

बारामती, पुणे : विज्ञानदृष्टी (Science) निर्माण करणारे शिक्षण हे आपल्याला हवे आहे. आपल्याकडे अनेक मोठमोठ्या विज्ञान संस्था आहेत. विद्यार्थ्यांना कधीतरी त्या ठिकाणी भेट देण्याची संधी मिळते. आमच्या विद्यार्थ्यांना वाटते परंतु त्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाची क्रीडांगण ठरतील अशी केंद्र सुरू होणे ही काळाची गरज आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले. ते बारामतीत बोलत होते. सायन्स अॅन्ड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटरचे उद्घाटन आज करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी त्यांनी विज्ञानाची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani), शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर शरद पवार इन्स्पायर फेलोशिप समारंभही पार पडला. फेलोशिप प्राप्त विद्यार्थ्यांशी थेट संवाद मान्यवरांनी साधला.

‘प्रत्येक जिल्ह्यात सायन्स सेंटर सुरू करणार’

अजित पवार म्हणाले, की विज्ञान-तंत्रज्ञानाची गरज ओळखून राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोग मुंबई महाराष्ट्रात जाण्याचा प्रयत्न करणार आहे. या सेंटरचा विज्ञानाची गोडी निर्माण करण्यात नक्कीच उपयोग होईल, याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही, असे म्हणत किती लोकांना माहिती आहे माहीत नाही, परंतु महाराष्ट्रात 9 ते 18 वयोगटातील 67 लाख शालेय मुले आणि 26,800 माध्यमिक शाळांच्यामध्ये औपचारिक शालेय शिक्षण त्या त्या ठिकाणी घेत आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. पुढच्या वर्षाच्या अर्थसंकल्पात प्रत्येक जिल्ह्यात सायन्स सेंटर सुरू केले जाणार. सरकार म्हणून आम्ही पुढाकार घेऊ, अशी घोषणा अजित पवारांनी यावेळी केली.

हे सुद्धा वाचा

आजची पिढी देशाचे उद्याचे मनुष्यबळ

प्रत्येक मुलाला स्वतःचे सामर्थ्य कौशल्य ओळखण्यात समर्थन करणे आणि ज्ञान कौशल्य आणि मूल्याचा पाया मजबूत करणार. त्याबरोबरच रोजगार आणि व्यावसायिक कौशल्य यांच्या निर्मितीसाठी आणि भविष्यातील शिक्षणासाठी पुढे जाण्यास तयार करणे याला प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे, असे अजित पवार म्हणाले. आपली आजची पिढी हे आपल्या देशाचे उद्याचे मनुष्यबळ आहे. त्यांना भविष्यकालीन येणाऱ्या आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यास तयार करत असताना त्या आव्हानांवर मात करून संधीत रुपांतर करता येईल, याचा विचार होणे गरजेचे आहे, असे अजित पवार म्हणाले.

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.