पुणे – जेष्ठ साहित्यिक डॉ.अनिल अवचट ( Dr. Anil Avchat) यांचे निधन झाले. आज सकाळी 9:15 वाजता पत्रकारानगरमधील त्याच्या राहत्या घरी अखेरचा श्वास (death) घेतला. ते 77 वर्षांचे होते. मराठी साहित्यामध्ये त्यांनी त्यांच्या पुस्तकं, लेख यांद्वारे मोलाचे योगदान दिलेआहे. त्यांच्या दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत त्यांनी मुक्तांगण (Muktangan) व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली. त्यांच्या पश्चात त्यांच्या विवाहित मुली मुक्ता आणि यशोदा, अन्य कुटुंबीय, आणि मोठा मित्रपरिवार आहे. डॉ. अनिता आणि अनिल अवचट यांच्या व्यासांमुक्तीच्या क्षेत्रातील कार्याचा वसा यापुढेसुद्धा असाच पुढे चालू राहील असा दिलासा मुक्तांगणचे अध्यक्ष डॉ. आनंद नाडकर्णी यांनी ही दुःखद बातमी सांगताना दिला आहे.
अल्प परिचय
पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे डॉ.अनिल अवचट यांचा जन्म झाला होता. त्यांनी बी. जे. मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस ची पदवी घेतली होती. महाविद्यालयीन जीवनापासूनच ते अनेक चळवळींमध्ये ते सहभागी झाले होते. ते स्वतः पत्रकार होते. मात्र पत्रकारितेतील व्यावसायिकतेला त्यांनी नेहमीच नकार दिला. त्यांच्या पत्रकारिता त्यांनी गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या प्रश्नानंसाठी केली. 1969 मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक ‘पूर्णिया’ हे प्रसिद्ध केले, तेव्हापासून सुरु झालेलया लेखणीतून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले. आतापर्यंत त्यांची 38 हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा गतवर्षीचा (2021) मसाप जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले होते.
या पुस्तकांचे केले लेखन
अमेरिका , अक्षरांशी गप्पा, आपले‘से’,आप्त, कार्यमग्न , कार्यरत, कुतूहलापोटी , कोंडमारा गर्द, छंदांविषयी , छेद, जगण्यातले काही , जिवाभावाचे , व्यक्तिचित्रे, दिसले ते धागे आडवे उभे, धार्मिक, People : ‘माणसं’ पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर, पुण्याची अपूर्वाई ) प्रश्न आणि प्रश्न ), बहर शिशिराचा : अमेरिकेतील फॉल सीझन ‘कार्यरत’ पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर), मजेदार ओरिगामी, मस्त मस्त उतार (काव्यसंग्रह), माझी चित्तरकथा, माणसं! , मुक्तांगणची गोष्ट पुस्तक : वनात..जनात, वाघ्या मुरळी ), वेध, शिकविले ज्यांनी, संभ्रम , सरल तरल, सुनंदाला आठवताना, स्वतःविषयी , सृष्टीत…गोष्टीत , सृष्टी-दृष्टी, वनात-जनात (बालवाङ्मय), हमीद , हवेसे
व्यसन मुक्ती केंद्राचे काम सुरु ठेवणे हीच खरी श्रद्धांजली होय- डॉ आनंद नाडकर्णी
जीवन साधेपणाने कसे जगायचे हे बाबाने शिकवले. 15 जानेवारीला ते पडले आणि शस्त्रक्रिया करावी लागली, हे काय ते निमित्त झालं, त्यातून बाबा सावरले नाहीत. अतिशय शांतपणे निर्वाण झालं. अहम भावाचे कधीच निर्वाण झाले होते. आता केवळ शरीराचे निर्वाण आहे. बाबा मधला निखळ स्नेहभाव कायम राहणार आहे. अनिल अवचट यांच्या स्मृतिसाठी सृजन सन्मान पुरस्कार आम्ही देणार आहोत. मुक्तांगण व्यसन मुक्ती केंद्राचे काम सतत चालू ठेवू, तीच बाबासाठी श्रद्धांजली ठरेल अशी श्रद्धांजली मुक्तांगणचे सध्याचे अध्यक्ष डॉ. आनंद नाडकर्णी यांनी व्यक्त केली आहे.
सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे हळवे-सहृदयी व्यक्तिमत्व हरपले – शरद पवार
ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, पत्रकार डॉ. अनिल अवचट यांच्या निधनाने डोळसपणे सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे हळवे-सहृदयी व्यक्तिमत्व हरपले. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून त्यांनी केलेले भरीव कार्य तळागाळातील अनेकांसाठी नव्या आयुष्याची सुरुवात ठरले. शोकाकुल अवचट कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. दिवंगत अनिल अवचट यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, पत्रकार डॉ. अनिल अवचट यांच्या निधनाने डोळसपणे सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे हळवे-सहृदयी व्यक्तिमत्व हरपले.
मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून त्यांनी केलेले भरीव कार्य तळागाळातील अनेकांसाठी नव्या आयुष्याची सुरुवात ठरले.— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 27, 2022
कृतीशील विचारवंत हरपला -उपमुख्यमंत्री अजित पवार
“ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक डॉ. अनिल अवचट कृतीशील विचारवंत होते. समाजातील संवेदनशील प्रश्नांवर त्यांनी स्पष्ट विचार मांडले. लोकहितासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. ‘मुक्तांगण’च्या माध्यमातून हजारो बांधवांना व्यसनमुक्त केलं. व्यसनमुक्ती चळवळीतील त्यांचं कार्य, त्यांनी केलेले प्रयोग अन्य देशांसाठी प्रेरणादायी, मार्गदर्शक ठरले. वैद्यकीय तज्ज्ञ, पत्रकार, लेखक, चित्रकार, शिल्पकार, विचारवंत, सामजिक कार्यकर्ता असं बहुआयामी जीवन समरसून जगणाऱ्या हरहुन्नरी डॉ. अनिल अवचट यांचं निधन ही महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक चळवळीची मोठी हानी आहे. डॉ. अवचट यांच्या कुटुंबियांच्या, ‘मुक्तांगण’ परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे. मी डॉ. अनिल अवचट यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मी डॉ. अनिल अवचट यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून श्रध्दांजली वाहिली.
महाराष्ट्र थोर समाजसेवकाला मुकला – संजय राऊत
अनिल अवचट हे लेखक, पत्रकार आणि कलावंत होते. त्यांनी मुक्तांगणाच्या माध्यमातून जे काम केलं ते जगाला आदर्श असं काम आहे. तरुण पिढीवर अंमली पदार्थांचा अंमल आहे. 25 ते 30 वर्षांपासून त्यांनी नशामुक्तीच्या कामात झोकून दिलं. त्यांनी मुक्तांगणमधून अनेक कुटुंबांना सावरलं. एका पिढीवर त्यांचे उपकार आहेत. सामाजिक कार्य म्हणजे काय ते त्यांनी दाखवून दिले. ते संवेदनशील लेखक होते. चांगले वक्ते होते. त्यांची धडपड समाजासाठी असायची. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र थोर समाजसेवकाला मुकला आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे.
पुण्याच्या सामाजिक-साहित्यिक विश्वात मोठी पोकळी – महापौर मुरलीधर मोहोळ
सुप्रसिद्ध आणि संवेदनशील लेखक, समाजसेवक डॉ. अनिल अवचट यांचे निधन पुण्याच्या सामाजिक-साहित्यिक विश्वात मोठी पोकळी निर्माण करणारे आहे. आधी पत्रकार, मग लेखक आणि त्यानंतर सामाजिक कार्यकार्यात त्यांनी स्वतःला झोकून देणे सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. ‘मुक्तांगण’च्या माध्यमातून त्यांनी व्यसनमुक्तीची चळवळ उभा करुन दिलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे आणि मोलाचे होते. डॉ. अनिल अवचट यांच्या स्मृती यथोचित जतन करण्याचा पुणे महापालिकेच्या माध्यमातून असेल.
सुप्रसिद्ध आणि संवेदनशील लेखक, समाजसेवक डॉ. अनिल अवचट यांचे निधन पुण्याच्या सामाजिक-साहित्यिक विश्वात मोठी पोकळी निर्माण करणारे आहे. आधी पत्रकार, मग लेखक आणि त्यानंतर सामाजिक कार्यकार्यात त्यांनी स्वतःला झोकून देणे सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. pic.twitter.com/SaVy0ASytj
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 27, 2022
Nagpur Health | थंडीमुळे वातरोग वाढलेत; काळजी कशी घ्यालं, डॉक्टर काय म्हणतात…