पुण्यात सिरमच्या कोव्हाव्हॅक्स लसीचे क्लिनिकल ट्रायल सुरु, जानेवारी महिन्यात लहान मुलांच्या लसीकरणास सुरुवात ?
सिरमच्या कोव्हाव्हॅक्स लसीच्या लहान मुलांवरील क्लिनीकल ट्रायलला सुरुवात झालू असून. भारतात 9 ठिकाणी 1 हजार मुलांवर ही ट्रायल करण्यात येणार आहे. पुण्यात तर या चाचणीला सुरुवतदेखील झाली असून बुधवारी 9 मुलांना लस देण्यात आली आहे.
पुणे : देशात तसेच महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबवली जात आहे. तर दुसरीकडे लहान मुलांच्या लसीकरणासाठी लस निर्मिती करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. सिरमच्या कोव्हाव्हॅक्स लसीच्या लहान मुलांवरील क्लिनीकल ट्रायलला सुरुवात झाली असून भारतात 9 ठिकाणी 1 हजार मुलांवर ही चाचणी करण्यात येणार आहे. पुण्यात तर या चाचणीला सुरुवतादेखील झाली आहे. बुधवारी 9 मुलांना लस देण्यात आलीय.
पुणे जिल्ह्यातील 100 मुलांवर केली जाणार चाचणी
सध्या देशात 18 वर्षे तसेच त्यापेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आहे. राज्यात तर ही प्रक्रिया युद्धपातळीवर राबवण्यात येतेय. तर दुसरीकडे सिरम इन्स्टिट्यूटमार्फत 18 वर्षाखालील मुलांसाठी लस निर्मिती करण्यात आली असून त्याची क्लिनिकल ट्रायल सुरु झाली आहे. पुणे जिल्ह्यातील भारती हॉस्पिटलमध्ये 100 मुलांवर ही क्लिनिकल चाचणी केली जाणार आहे. यामध्ये 2 ते 18 वयोगटातील मुलांना ही लस दिली जाईल.
पुण्यात बुधवारी 9 मुलांना दिली लस
याच क्लिनिकल ट्रायल अंतर्गत पुण्यात बुधवारी 9 मुलांना लस देण्यात आली. देशाच्या विविध भात ही चाचणी प्रक्रिया पार पाडली जातेय. येत्या ऑक्टोबरअखेर चाचणीची प्रक्रिया होणार पूर्ण होण्याची शक्यता आहे.
पुढील वर्षी जानेवारी महिन्यात लहान मुलांचे लसीकरण
विशेष म्हणजे चाचणी पूर्ण झाल्यानंतर या लसीचे परिणाम जर सकारात्मक आले तर पुढील वर्षी जानेवारी महिन्यात लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तशी माहिती भारती हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. संजय ललवाणी यांनी दिली आहे.
स्प्रेद्वारे केला जाणार कोरोनावर उपचार
तर दुसरीकडे कोरोनाला थोपवण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक वेगवेगळ्या उपचार पद्धती शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच प्रकारे एका उपचार पद्धतीच्या चाचणीचे प्रयोग नागपुरातदेखील केले जात आहे. नागपुरात चाचणी करण्यात येत असलेली उपचार पद्धती ही स्प्रेच्या स्वरूपात आहे. या उपचार पद्धतीच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल जगातील वेगवेगळ्या ठिकाणी सुरु आहे.
दिवसातून सहा वेळा स्प्रेच्या माध्यमातून औषध
नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात औषधाची तसेच उपचार पद्धतीची याची ट्रायल घेतली जात आहे. एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर 48 तासांच्या त्याच्या नाकात हा नेझल स्प्रे मारला जातो. दिवसातून सहा वेळा स्प्रेच्या माध्यमातून हे औषध दिले जाते. पाच दिवस ठराविक अंतरावर हा स्प्रे मारायचा आहे. कोरोनाची सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णावर याची ट्रायल घेण्यात येत आहे.
इतर बातम्या :
भाजीपाला विकणारे भुजबळ 25 वर्षात 25 हजार कोटींचे मालक कसे?, पालकमंत्रीपद काढून घ्या; कांदेंचा घणाघात
नदीचा अचानक प्रवाह वाढला, कंटेनर पुलाच्या मधोमध अडकला, काय करावं कळेना, आणि….
NEET Answer Key 2021: नीट यूजी परीक्षेची उत्तरतालिका लवकरच जाहीर होणार, विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षाhttps://t.co/WTXZphn4HO#NEET | #NEETAnswerKey | #NEET2021 |#NEETUG2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 30, 2021
(serum covovax vaccine for children clinical trial start in pune hospital)