ShahajiBapu Patil : राष्ट्रवादीने तिजोरी गिळली, शाहजीबापुंचा आरोप, म्हणतात आम्ही ठोका देणारच…

राष्ट्रवादीने राज्याची तिजोरी गिळून टाकली. मात्र आम्ही काय मेलेल्या आईचे दूध पिलो नाही. आम्हीही ठोका देणारच असे म्हणत शहाजी बापू पाटलांनी पुन्हा राष्ट्रवादीला धुतलंय. आजच्या पुरंदरच्या सभेत ते बोलत होते. या सभेत इतरही बडे नेते उपस्थित होते.

ShahajiBapu Patil : राष्ट्रवादीने तिजोरी गिळली, शाहजीबापुंचा आरोप, म्हणतात आम्ही ठोका देणारच...
राष्ट्रवादीने तिजोरी गिळली, शाहजीबापुंचा आरोप, म्हणतात आम्ही मेलेल्या आईचं दूध नाही पिलो, ठोका देणारच...
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 4:47 PM

पुणे : सांगोला तालुक्याचे आमदार शहाजी बापू पाटील (ShahajiBapu Patil) एका डायलॉगने देशभर गाजले. मात्र जेव्हापासून ते गुवाहाटीवरून परत आलेत. तेव्हापासून ते संजय राऊत आणि राष्ट्रवादीला (NCP) सतत टार्गेट करत आहेत. राष्ट्रवादीने शिवसेनेचे आमदारांना निधी मिळू दिला नाही. सर्व निधी हा राष्ट्रवादीच्याच आमदारांना दिला, असा आरोप जवळपास सर्वात बंडखोर आमदार करत (Cm Eknath Shinde) आहेत. शहाजी बापू पाटील यांनीही याच बंडखोरांच्या सुरात सूर मिसळला आहे. आज पुरंदरमध्ये तर शहाजीबापू पाटलांनी पुन्हा राष्ट्रवादी विरोधात तुफान बॅटिंग केलीय. यावेळी राष्ट्रवादीने राज्याची तिजोरी गिळून टाकली. मात्र आम्ही काय मेलेल्या आईचे दूध पिलो नाही. आम्हीही ठोका देणारच असे म्हणत शहाजी बापू पाटलांनी पुन्हा राष्ट्रवादीला धुतलंय. आजच्या पुरंदरच्या सभेत ते बोलत होते. या सभेत इतरही बडे नेते उपस्थित होते.

शिंदे आम्हाला घेऊन नाही गेले…

यावेळी बोलताना शाहाजी बापू पाटील म्हणाले, आज आपल्या नव्या भूमिकेत आपले मुख्यमंत्री आले आहेत. मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद हवा आहे. जे महाराष्ट्रात राजकारण झालं, त्याला कुणी गद्दार म्हटलं कुणी काय म्हटलं, मात्र क्रांती घडवली आहे.निवडणुका झाल्यानंतर आम्हाला वाटलं भाजप सेना युतीचे सरकार येणार अस वाटलं होतं.मात्र तुम्ही आम्हाला फरफटत नेलं आणि राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलं, मात्र असू द्या तरी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, ठाकरे घराण्यात मुख्यमंत्री पद मिळालं, तुमचा पाया पडतो आम्ही 40 आमदार शिंदे साहेबांना घेऊन गेलो, ते नाही आम्हाला घेऊन गेले, असेही यावेळी शाहाजीबापू पाटलांनी यावेळी स्पष्ट केलंय.

आम्हीही ठोका देणारच

आमची काम होत नसतील, तरआपण काम कुठे करायचं? कर्नाटकात जाऊन? असाही सवाल यावेळी बापुंनी केलाय. तर राष्ट्रवादीने तिजोरी गिळून टाकली, असा आरोपही त्यानी केला आहे. तसेच अंतकरणापासून सांगतो कुठलं नेतृत्व पटलं असेल तर ते एकनाथ शिंदे साहेबांचे आहे. आम्हीही मेलेल्या आईच दूध पिलो नाही, आम्ही पण ठोका देणार, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला आहे. तर एकनाथ शिंदे यांचे विचार घराघरात पोहचवायचे आहेत. एक एक करून आमदार गेलेत, शिंदे साहेब कधी गेलेत एकालाही कळलं नाही, तुमचं सीआयडी खातं काय करत होतं? असा सवालही त्यांनी गेल्या सरकारला केला आहे. तर आम्ही जे केलं शिवसेना वाचवण्यासाठी केलं, बाळासाहेब ठाकरे आणि दिघे साहेबांचे विचार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी केलं. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर कुठला मुख्यमंत्री लाभला असेल तर ते एकनाथ शिंदे असे म्हणत त्यांनी शिंदेंचं कौतुक केलंय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.