Vidhan Parishad Election : प्रकृती ठीक नसेल तर येवू नका, शंकर जगताप यांनी सांगितली पक्षाची भूमिका, मात्र…

विधान परिषदेची निवडणूक आज पार पडत आहे. 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. तर सर्वच पक्ष विजयाचा दावा करत आहेत. दरम्यान, राज्यसभेप्रमाणेच विधान सभेसाठीही मतदान करण्यासाठी भाजपा आमदार लक्ष्मण जगताप हे थोड्याच वेळात मुंबईला येण्यासाठी रवाना होणार आहेत.

Vidhan Parishad Election : प्रकृती ठीक नसेल तर येवू नका, शंकर जगताप यांनी सांगितली पक्षाची भूमिका, मात्र...
लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगतापImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 9:55 AM

पिंपरी चिंचवड : प्रकृती ठीक नसेल तर येऊ नका, असा आदेश पक्षाने दिला होता. मात्र आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांची तब्येत ठीक आहे. सामनामध्ये काय आरोप केला माहीत नाही, पण पक्षाने स्पष्ट सांगितले होते, की तब्येत ठीक नसेल तर येऊ नका, अशी माहिती लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप (Shankar Jagtap) यांनी दिली आहे. मात्र लक्ष्मण जगताप मतदान करणार आहेत. भाजपा आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा आरोप सामनामध्ये करण्यात आला होता. या आरोपावर शंकर जगताप यांनी उत्तर दिले आहे. आज विधान परिषदेसाठी मतदान होत आहे. सध्या लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक आजारी आहेत. राज्यसभेसाठीदेखील ते अॅम्ब्युलन्समधून मुंबईत मतदानाला आले होते. या पार्श्वभूमीवर टीकाही भाजपावर होत होती.

काय म्हटले सामनामध्ये?

नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना मतदानाची परवानगी नाही, पण त्याचवेळी लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक या दोन आजारी आमदारांना अत्यंत नाजूक स्थितीत मतदानास उचलून आणले जात आहे. हे दोन्ही आमदार कर्करोगाशी झुंजत आहेत. व्हेंटिलेटरवर त्यांचा श्वास आहे, असे म्हणतात. पण राजकीय स्वार्थ असला, की माणुसकी तुडवून त्यांना स्ट्रेचर आणि व्हीलचेअरवर मतांसाठी आणले जात आहे. विजयाची किंवा चमत्काराची इतकीच खात्री असताना हे अमानुष आणि अघोरी प्रयोग कशासाठी, असा सवाल सामनातून करण्यात आला आहे. तर राजकीय फायद्यासाठी भाजपा कोणत्याही अमानुष थरापर्यंत घसरू शकतो, याचेच नाव चमत्कार, असा टोलाही लगावला आहे.

थोड्याच वेळात निघणार लक्ष्मण जगताप

विधान परिषदेची निवडणूक आज पार पडत आहे. 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. तर सर्वच पक्ष विजयाचा दावा करत आहेत. दरम्यान, राज्यसभेप्रमाणेच विधान सभेसाठीही मतदान करण्यासाठी भाजपा आमदार लक्ष्मण जगताप हे थोड्याच वेळात मुंबईला येण्यासाठी रवाना होणार आहेत. विधान परिषदेसाठी एक-एक मत महत्त्वाचे आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. आपले सगळे आमदार मतदानासाठी येतील, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

हे सुद्धा वाचा

काय म्हटल शंकर जगताप यांनी?

पक्षाने आम्हाला आधीच सांगितले आहे, की लक्ष्मण जगताप यांची तब्येत ठीक नसेल तर येवू नका. पक्षापेक्षा माणूस महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्यांनी आधीही आग्रह केला नाही, आत्ताही पक्षाचा कोणताही आग्रह नाही. काल देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झाले आहे, असे शंकर जगताप म्हणाले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.