ईडीची कारवाई बघून काही जण भाजपकडे गेलेत, शरद पवार यांचा इशारा कुणाकडे?

राजकारणात सत्याची कास सोडून जात असतील. तर अशा लोकांना सामान्य लोकं त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. असंही शरद पवार यांनी ठणकावून सांगितले.

ईडीची कारवाई बघून काही जण भाजपकडे गेलेत, शरद पवार यांचा इशारा कुणाकडे?
Follow us
| Updated on: Aug 20, 2023 | 5:37 PM

पुणे : देशात काही जणांविरोधात ईडीची कारवाई केली जात होती. त्यामुळे आमच्या काही सहकाऱ्यांनी रस्ता बदलला. ईडीच्या भीतीने हे सर्व केले गेले. ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याचे सांगतात. पण, आमची वैचारिक भूमिका बदलली नाही. तिकडं आत जावं लागेल, अशी भूमिका तिकडे गेलेले काही लोकं मांडतात, असंही शरद पवार म्हणाले. राजकारणात सत्याची कास सोडून जात असतील. तर अशा लोकांना सामान्य लोकं त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. असंही शरद पवार यांनी ठणकावून सांगितले.

पुणे येथे बोलताना शरद पवार म्हणाले, वर्तमानपत्र बारकाईने वाचले पाहिजे. टेलीव्हीजन बघीतले पाहिजे आणि काय चालले याचा विचार केला पाहिजे. महागाई, गुन्हेगारी काही संपत नाही. शेतकऱ्यांना बाजारपेठेत योग्य भाव मिळत नाही. असे अनेक प्रश्न आहेत. याची सामान्यांना चिंता आहे, याची आठवण शरद पवार यांनी करून दिली.

गुजरातला किती प्रकल्प गेले?

गेल्या सहा महिन्यांत गुजरात किंवा अन्य राज्यात किती प्रकल्प गेले. जो कारखाना राज्यात येणार होता. तो कारखान येथून अन्य राज्यात हलवला गेला. यात चांगले काम करण्याची संधी राज्य सरकारने गमावली आहे. असंही शरद पवार यांनी राज्य सरकारला फटकारले.

कांदा निर्यात धोरणावर टीका

कांद्यावर शुल्कवाढ केल्याने जगातील मार्केट शेतकऱ्यांसाठी बंद झालं. अशी टीका शरद पवार यांनी केंद्राच्या कांदा निर्यात धोरणावर केली. काहीही निर्णय घेतले जातात. वाराणसी जिथून पंतप्रधान निवडून येतात. तिथं गांधीवादी संस्था आहे. १९६० साली जमीन रेल्वे खात्याकडून घेतली होती. विनोबा भावे, जयप्रकाश नारायण, लालबहाद्दूर शास्त्री यांच्या सह्या होत्या.

गांधीवादी विचाराचा प्रचार प्रसार केला जात होता. हे सारं थांबवायला सांगण्यात आलं. तिथली गांधी विचारांची पुस्तकं फेकून देण्यात आली. अशी भूमिका वाराणसीमध्ये घेतली जाते. ज्या ठिकाणाहून पंतप्रधान निवडून येतात. याचा अर्थ सत्तेचा गैरवापर करण्यासाठी कोणत्या पातळीवर सरकार जात आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.