Marathi News Maharashtra Pune Sharad Pawar Did Pawar avoid going to the ganpati temple on the pretext of eating meat? Still the confusion of theist atheism
मी आणि पवार साहेबांनी मी नाँनव्हेज खालले म्हणून आज ते मंदिरात गेले नाहीत अशी माहिती राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. त्यानंतर पुन्हा पवारांच्या अस्तिक-नास्तिकतेचा संभ्रम अद्यापही कायम आहे.
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शरद पवार (Sharad Pawar) नास्तिक असल्याचा थेट आरोप केलो हाता. मात्र त्यानंतर शरद पवारांचे देवासमोरचे अनेक फोटो व्हायरल झाले. त्यानंतर शरद पवार आज पुण्यात श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या (Dagdusheth Ganpati Darshan) दर्शनाला जाणार होते. ते तिथे पोहोचलेही मात्र त्यांनी यावेळी मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेतले. तर मी आणि पवार साहेबांनी मी नाँनव्हेज खालले म्हणून आज ते मंदिरात गेले नाहीत अशी माहिती राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. त्यानंतर पुन्हा पवारांच्या अस्तिक-नास्तिकतेचा संभ्रम अद्यापही कायम आहे. कारण पुण्यात मासाहाराचं कारण देत शरद पवारांनी दगडूशेठ मंदिरात जाणं टाळलं? असा सवाल आता राजकारणात चर्चेत आहे. आता यावरूनही बऱ्याच राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
यावर ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली होती. भक्त माणूस देवळात आला, शरद पवारसाहेब पुण्यातील दगडूशेठ गणपती चे दर्शन घेणार आहेत याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे. आजपर्यंत केवळ इफ्तार पार्टी करणारे पवार साहेब आत्ता मंदिरात जात आहेत आणि आम्हाला ते याची डोळी याची देही पाहायला मिळत आहे. या बद्दल श्री गणपतीचे आभार अशी खोचक प्रतिक्रिया दवे यांनी दिली आहे. राष्ट्रवादीकडून जातीय टीका होत असल्याचा आरोप आणि त्याला पवारांची समर्थन असल्याचाही आरोप करत, ब्राम्हण महासंघाने काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांची भेट नाकारली होती. त्यांनी शरद पवार यांनी अमोल मिटकरी आणि छगन भुजबळ यांच्या वक्तव्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही केली होती.
राज ठाकरे यांच्याकडून पवारांवर अनेकदा टीका
राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीवर हल्लाबोल चढवताना राष्ट्रवादीच्या उदयापासून जातीय राजकारण पसरले, तसेच शरद पवार देव मानत नाही. त्यांचा देवाला हात जोडणार एक फोटोही शोधून सापडणार नाही. ते नास्तिक आहेत. अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. मात्र त्यानंतर पवारांचे अनेक फोटो व्हायरल होत होते. ज्या फोटोत ते देवासमोर दिसत होते. या फोटोंची आणि जातीय राजकारणाची गेल्या काही दिवसात बरीच चर्चा रााहिली आहे. आता पुन्हा पवारांच्या गणपती दर्शनाने आणि मंदिरात न जाता बाहेरून दर्शनाने हाच मुद्दा चर्चेत आला आहे.