मोठी बातमी : आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांची आक्रमक भूमिका; म्हणाले, आता सुप्रीम कोर्टात…

Sharad Pawar on Dhangar Reservation : मुंबईत छगन भुजबळ यांच्यासोबतच्या भेट झाली. त्यानंतर शरद पवारांनी आरक्षणप्रश्नावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. बारामतीत बोलताना शरद पवारांनी मोठं विधान केलं आहे. शरद पवार नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर बातमी.......

मोठी बातमी : आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांची आक्रमक भूमिका; म्हणाले, आता सुप्रीम कोर्टात...
शरद पवार
Follow us
| Updated on: Jul 18, 2024 | 9:19 PM

अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त बारामतीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं आहे. या कार्यक्रमात शरद पवार संबोधित करत आहेत. यावेळी बोलताना शरद पवार यांनी आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेतली आहे. धनगर आरक्षणासंदर्भात शरद पवारांनी मोठं विधान केलंय. मधोजी शिंदे धनगर आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात जाणार आहेत. त्याला आम्ही पूर्ण मदत करणार आहोत, असं शरद पवारांनी जाहीर व्यासपीठावरून आश्वासन दिलं आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमातील भाषण संपल्यानंतर शरद पवार पुन्हा व्यासपीठावर आले. भाषण संपल्यानंतर माईकवरून त्यांनी ही घोषणा केली आहे. सुप्रीम कोर्टातील लढण्यासाठी पूर्ण मदत करणार असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.

शरद पवारांकडून भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख

आजचा सोहळा अतिशय महत्त्वाचा आहे. लोकांनी दिलेलं राज्य लोकांसाठी कसं वापरायचा याचा आदर्श अनेकांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करता येईल. देशात अनेक राजे होवून गेले. पण 300 वर्षांनंतर सुद्धा त्याचं नाव लोक आदराने घेतात. सामान्य माणसांसाठी त्यांनी राज्य स्थापन केलं. भोसल्यांचे राज्य म्हणून कधी त्यांनी सांगितलं नाही. ते सामान्य रयतेचे राजे म्हणून वावरले. हा इतिहास आहे. अनेक संकट आली तेव्हा त्याची चिंता केली नाही. पाण्याच्या विहिरी काढून उपेक्षितांना मदत केली, असं शरद पवार म्हणाले.

अहिल्याबाई होळकर यांच्या लढ्याबाबत पवार काय म्हणाले?

अहिल्याबाई होळकरांवरही अनेक संकटं आली. पण तेव्हा देखील त्यांनी धैर्य दाखवलं. आज धनगर समाज कष्टाळू समाज आहे. असा हा समाज आहे. देशाच्या स्वतंत्रात योगदान मोठं होतं. या बारामतीत स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली. जगन्नाथ कोकरे हे त्यासाठी तुरुंगात गेले होते. अनेकांची नाव सांगत येतील. मला 50 वर्ष राजकारणात साथ दिली. लोकांनी माझ्या मागे ताकद उभी केली. आज बारामती आपण अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने 500 कोटी खर्च करुन आपण मेडिकल कॉलेज करत आहोत. अनेक संस्था आपण आज उभ्या करात आहोत, असंही शरद पवार म्हणाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.