अजित पवार यांच्या भेटीवर शरद पवार पुन्हा बोलले, म्हणाले, आमच्यात…

टोमॅटोचे भाव वाढले आहेत. शेतकऱ्यांना चार पैसे मिळत असताना नेपाळकडून केंद्र सरकार टोमॅटो खरेदी करत आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं.

अजित पवार यांच्या भेटीवर शरद पवार पुन्हा बोलले, म्हणाले, आमच्यात...
sharad pawar Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 14, 2023 | 10:55 AM

पुणे | 14 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात भेट झाल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीत बरंच काही घडल्याचीही चर्चा आहे. मात्र, या भेटीमुळे राज्यात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनीही या भेटीवर प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहेत. ठाकरे गटाने तर अशा भेटीतून तुम्ही नातीगोती जपता. मग कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून हाणामारी का करायच्या?, असा सवाल केला आहे. पवार काका पुतण्यांच्या भेटीवरून काहूर माजल्याने शरद पवार यांनी त्यावर पुन्हा भाष्य केलं आहे. आमच्यात संभ्रम निर्माण करू नका, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.

शरद पवार पुण्यात आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अजितदादांबरोबरच्या भेटीवर भाष्य केलं. संभ्रम वगैरे काही नाही. महाविकास आघाडीतील आम्ही तिन्ही पक्ष विचाराने एकत्र आलो आहोत. भाजपशी संबंधित जे आहे त्या घटकांशी आमचा कोणत्याही प्रकारे सहभाग नाही, ही भूमिका स्पष्ट झाल्यावर संभ्रम राहिलेला नाही. एकदा एक गोष्ट स्पष्ट केल्यावर तुम्ही पुन्हा पुन्हा संभ्रम निर्माण करू नका. मी जे सांगतोय तेच माझं मत आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

हे चित्र दुरुस्त करा

यावेळी ठाण्यातील रुग्णालयात झालेल्या मृत्यूच्या तांडवावरही त्यांनी भाष्य केलं. चिंताजनक आहे. घडलं कुठं ठाण्यात. मुख्यमंत्री ठाण्यातून येतात. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात जर अशा घटना घडत असतील तर दुर्देवी आहे. राज्य कोणत्या दिशेने जात आहे हे दिसून येत आहे. जे लोक मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहे. ठाण्यात मृत्यूचं तांडव झालं. हे चित्र दुरुस्त करण्यासाठी सरकारने कठोर आणि तातडीचे पाऊल टाकले पाहिजे, असं आवाहन शरद पवार यांनी केलं.

शेतकऱ्यांना मदत करा

दुष्काळी भागात पाऊस नाही. बारामतीतही टँकर लावण्याची वेळ आली. काही ठिकाणी लोक छावण्यांची मागणी करत आहेत. पाऊस नाही. काही ठिकाणी पेरण्या झाल्या. तिथे दुबारपेरणीचं संकट आलं आहे. राज्य सरकारने गंभीरपणे पाहावं आणि शेतकऱ्यांना मदत करावी, असं आवाहनही त्यांनी केलं.

जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न

टोमॅटोचे भाव वाढले आहेत. शेतकऱ्यांना चार पैसे मिळत असताना नेपाळकडून केंद्र सरकार टोमॅटो खरेदी करत आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. दोन पैसे शेतकऱ्यांना मिळतात म्हटल्यावर परदेशातून माल आणण्याची भूमिका सरकार घेते. शेतकरी उत्पादक आहे, त्याला दोन पैसे जास्त मिळत असतील तर त्याच्या पाठी उभं राहण्या ऐवजी आज त्याला यातना कशा देता येईल ही भूमिका राज्यकर्ते घेत आहेत. अशा प्रकारे टोमॅटो आयात करणं हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे, अशी टीका त्यांनी केली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.