सत्ताधाऱ्यांकडून लोकप्रतिनिधींना डाऊन करण्याचं काम; शरद पवार यांचा सकाळी सकाळीच हल्लाबोल

कोर्टाच्या निर्णयांवरून सरकारचा दृष्टीकोण चुकीचं आहे, हे दिसून आलंय. त्यातून सत्ताधाऱ्यांनी काही तरी शिकलं पाहिजे, असा चिमटाही त्यांनी काढला.

सत्ताधाऱ्यांकडून लोकप्रतिनिधींना डाऊन करण्याचं काम; शरद पवार यांचा सकाळी सकाळीच हल्लाबोल
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 31, 2022 | 10:31 AM

पुणे: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज सकाळी सकाळीच मीडियाशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. राज्यात सत्तेचा गैरवापर सुरू आहे. लोकप्रतिनिधींना डाऊन करण्यासाठीच सरकार काम करत आहे, अशी टीका करतानाच कोर्टाने अनिल देशमुख आणि संजय राऊत यांना जामीन दिला आहे. आता त्यातून सत्ताधाऱ्यांनी काही तरी शिकलं पाहिजे, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे. पवार यांच्या या टीकेवर सत्ताधारी काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सत्तेचा गैरवापर होत आहे. संजय राऊत आणि अनिल देशमुखांबाबत कोर्टाने निर्णय घेतला. काही सदस्य आतमध्ये आहे. त्यांनाही न्याय मिळेल. जामीन हा हक्क आहे. ज्या कारणाने या लोकांना आत टाकलं त्यात फारसं काही दिसत नाही, हा निष्कर्ष न्याय देवतेने काढला आहे. त्यामुळे सत्तेचा गैरवापर करून गेल्या काही महिन्यांपासून लोकप्रतिनिधींना डाऊन करण्याचं काम करण्यात आल्याचं स्पष्ट दिसतं, असं शरद पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

कोर्टाच्या निर्णयांवरून सरकारचा दृष्टीकोण चुकीचं आहे, हे दिसून आलंय. त्यातून सत्ताधाऱ्यांनी काही तरी शिकलं पाहिजे, असा चिमटाही त्यांनी काढला.

1 फेब्रुवारीला केंद्राचं बजेट सादर होणार आहे. ते महत्त्वाचं आहे. त्यातून सरकारची नीती काय? हे दिसून येईल. या महत्त्वाच्या कालावधीत देशाचा विचार करून संसदेची गरीमा लक्षात ठेवून सरकारनं पावलं टाकली पाहिजे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचं कालच सूप वाजलं. गेल्या आठ दिवसात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तर सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांना जशास तसे उत्तर देत कामकाज पुढे नेले.

या अधिवेशन कालावधीत दिशा सालियन प्रकरणी एसआयटीची चौकशीची घोषणा करण्यात आली. तसेच एकनाथ खडसे यांच्या पत्नीने केलेल्या भूखंड घोटाळ्याचीही एसआयटीकडून चौकशी करण्याचे जाहीर करण्यात आले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.