Sharad Pawar : ब्राम्हण महासंघाची भूमिका योग्य नाही, पवारांना भेट नाकरल्यानंतर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

आता ब्राम्हण महासंघाची नाराजी पुढे आल्याने पुन्हा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र ब्राम्हण महासंघाने भेट नाकारली, ही त्यांची भूमिका योग्य नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीकडून देण्यात आलीय.

Sharad Pawar : ब्राम्हण महासंघाची भूमिका योग्य नाही, पवारांना भेट नाकरल्यानंतर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 7:30 PM

पुणे : राज्याच्या राजकारणात आधी अनेक मुद्द्यावरून आणि जातीय राजकारणावरून वाद सुरू असताना आता त्यात आणखी वाढ झाली आहे. कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना ब्राम्हण महासंघाने (Brahmin Federation) भेट नाकरल्याने राजकारणात खळबळ माजली आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी आणि छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर ब्राम्हण महासंघाने आक्षेप घेतला आहे. तसेच शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे मिटकरी (Amol Mitkari) आणि भुजबळांच्या वक्तव्याचे समर्थन केल्याचा आरोप ब्राम्हण महासंघाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता त्यावरून पुन्हा एकदा जोरदार खडजंगी सुरू झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे हे राष्ट्रवादी आणि शरद पवारांवर जातीय राजकारण पसरवल्याचा आरोप करत आहेत. त्यातच आता ब्राम्हण महासंघाची नाराजी पुढे आल्याने पुन्हा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र ब्राम्हण महासंघाने भेट नाकारली, ही त्यांची भूमिका योग्य नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीकडून देण्यात आलीय.

राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया काय?

ब्राम्हण महासंघाची एखाद्या गोष्टीबाबत नाराजी असती तर चर्चा करता आली असती. त्यासाठी त्यांना भेटीसाठी बोलावलं होतं. मात्र त्यांनी भेट नाकारली. हे योग्य नाही. चर्चेतून मार्ग निघाला असता. त्यांनी टोकाची भूमिका न घेता, शरद पवार यांची भेट घ्यावी. या भेटीतून मार्ग निघेल. शेवटी जे काही झालं, याबाबत यांची भूमिका काय होती, यावरच चर्चा होणार होती. हाच पवारांचा हेतू होता, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे म्हणाले आहेत.

महासंघ वगळता इतर संघटना घेणार भेट

या प्रकरणातही आता नवं ट्विस्ट आलंय. कारण ब्राम्हण महासंघ वगळता इतर ब्राम्हण संघटना शरद पवारांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यात राज्यातील जवळपास 20 ते 22 ब्राम्हण संघटनाचे प्रतिनिधी शरद पवारांची भेटणार आहेत. उद्या संध्याकाळी 5 वाजता निसर्ग मंगलकार्यालत ही भेट नियोजित आहे.

हे सुद्धा वाचा

ब्राम्हण महासंघाचे आरोप काय?

आम्ही ही भेट नाकारली आहे. पवारांना पूर्ण आदर आणि सन्मान ठेऊन ही भूमिका घेतली आहे. आमच्या वेदना आम्ही सांगण्यापेक्षा पवारांना आधीपासूनच त्याची कल्पना आहे. आमच्या काय तक्रारी असायला हव्या हे आमच्यापेक्षा जास्त त्यांना माहिती आहे. आम्ही जुन्या विषयात जात नाही. मात्र मिटकरी यांच्या वक्तव्यानंतर पवारांच्या उपस्थित आम्ही धंदा करतो असे शब्द वापरले, असे बोलले. तसेच मंदिरात आम्हाला आरक्षण आहे, असे बोलले. असा आरोप त्यांनी केला आहे.

वाद कोणत्या वक्तव्याने?

सांगलीच्या इस्लामपुरात राष्ट्रवादी काँग्रेसची सभा झाली होती. त्या सभेत कन्यादान या विषयवार अमोल मिटकरींनी वक्तव्य केलेल होतं.  कन्या हा दान करण्याचा विषय नाहीये, असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र कन्यादानावेळी सांगितलेल्या मंत्राचा अर्थ मी सांगितला होता, असं मिटकरींनी म्हटलंय. त्यानंतर हा वाद पेटला आहे. तर छगन भुजबळ यांनी पवारांच्या उपस्थितीत ज्योतिष, पुरोहित हे धंदा करतात, असा शब्द वापरला. त्यांना व्यवसाय हा शब्द वापरता आला असता मात्र तोही नाही वापरला. असा आरोप ब्राम्हण महासंघाने केला आहे.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...