पुणेः राष्ट्रवादी काँग्रेसच्या (National Congress Party) राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेत आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलेल्या भाषणानंतर अनेक क्रिया प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. नाट्यअभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनीही आता या वादात उडी घेत राष्ट्रवादीचे नेते तुम्ही एका जातीबद्दल कसं काय बोलू शकता? असा सवाल उपस्थित केला आहे. तो सवाल करुन ते थांबले नाहीत तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी अमोल मिटकरी, जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांना झापलं पाहिजे अस मतही त्यांनी व्यक्त केले. तुम्ही एका समाजाबद्दल कसं काय बोलू शकता असा सवाल करत त्यांनी राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी जे बोलले आहे, की, राष्ट्रवादी काँग्रेसमुळे जातीवाद वाढला आहे ते चुकीचे कसं म्हणू शकता असं मतही त्यांनी व्यक्त केले.
अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेत भटजीची नक्कल केल्यानंतर त्यांच्या वर महाराष्ट्रातून टीका करण्यात आली. त्यानंतर जयंत पाटील यांनी दिलगिरीही व्यक्त केली. जयंत पाटील यांच्या दिलगिरीविषयी बोलताना शरद पोंक्षे यांनी सांगितले की, अमोल मिटकरी भाषण करताना तुम्ही त्यांना हसून दाद देता, आणि तुम्हाला आवडलं म्हणून त्यांना तुम्ही तो मंत्र पुन्हा म्हणायला सांगता आणि त्याचा यथोच्छ आनंद तुम्ही आणि मंत्री धनंजय मुंडे तुम्ही दोघं मिळून त्यावर हसता यावरही त्यांनी टिप्पणी केली आहे.
यावेळी त्यांनी सांगितले की, संविधानाला अनुसरुन तुम्ही शपथ घेता, आणि एका समाजाबद्दल, कन्यादान करण्याबद्दल बोलून त्याचा तुम्ही आनंद कसं काय घेऊ शकता, असं म्हणून हे सगळं प्रकरण जेव्हा तुमच्या अंगलट आलं तेव्हा तुम्हाला दिलगिरी व्यक्त करण्याची बुद्धी सुचली अशी भावनाही त्यानी व्यक्त केली.
ज्या व्यासपीठावरुन एका समाजावर बोललं जात होते, आणि त्याची टीका केली जात होती त्यावेळी हे मंत्री त्याचा आनंद घेत होते, मात्र कोणालाही त्यांचे भाषण थांबवायची इच्छा कुणालाही झाली नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी टीव्ही नाईनशी बोलाताना दिली. भटजीबद्दल टीका झाल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसमुळे हे जातीवाद वाढला नाही हे जयंत पाटील व्यासपीठावर सांगून सिद्ध करू शकले असते असंही त्यांना यावेळी सांगितले.
संबंधित बातम्या
केवळ घोषणांचा पाऊस व शेतकऱ्यांची फसवणूक; ठाकरे सरकारवर आ. सुधीर मुनगंटीवार यांचा घणाघात
Corona R Value : ‘आर व्हॅल्यू’चं प्रकरणं नेमकं काय… कोरोनाची चौथी लाट येणार?