चार महिन्यांचं बाळ घेऊन परीक्षा द्यायला गेली, परीक्षा केंद्राबाहेर बाळाचं रडू थांबेना, मग…

आपल्या नवऱ्याजवळ बाळ देऊन ती महिला परीक्षा देण्यासाठी आत गेली.

चार महिन्यांचं बाळ घेऊन परीक्षा द्यायला गेली, परीक्षा केंद्राबाहेर बाळाचं रडू थांबेना, मग...
चार महिन्यांचं बाळ घेऊन परीक्षा द्यायला गेलीImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Oct 06, 2022 | 3:44 PM

अभिजित पोटे, TV9 मराठी, प्रतिनिधी, पुणे : कोण कसा कुणाच्या मदतीला धावून येईल, काही सांगता येत नाही. पुण्यात परीक्षेसाठी गेलेल्या आईचं चार महिन्यांचं बाळ बाहेर वडिलांजवळ रडत होतं. महिला पोलीस कर्मचारी तेथं तैनात होत्या. त्यांनी त्या चार महिन्यांच्या बाळाला जवळ घेत मायेची ऊब दिली. परीक्षा केंद्राबाहेर दोन तास बाळाला खेळण्यात गुंतवून ठेवलं. पोलिसाची ड्यूटी करत असताना आईची भूमिका पार पाडली. या महिला पोलिसाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

पुण्यात काल पुणे महापालिकेच्या काही पदांसाठी भरती प्रक्रियेची परीक्षा पार पडली. बुधवारी पार पडलेल्या या परीक्षेत रामटेकडी येथील परीक्षा केंद्रावर एक वेगळे दृश्य पाहायला मिळालं. या परीक्षा केंद्रावर अनेक महिला देखील परीक्षा देण्यासाठी आल्या होत्या.

त्यात काही महिला गरोदर तर काही नुकत्याच जन्मलेल्या आपल्या लहान बाळाला घेऊन परीक्षेसाठी आल्या होत्या. याच परीक्षा केंद्रावरून आता एका लहान बाळाचा आणि एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

एक महिला परीक्षा देण्यासाठी आपली अवघी चार महिन्याचे बाळ घेऊन दुपारी परीक्षा केंद्रावर आली होती. परीक्षा केंद्रात परीक्षांची शिवाय कुणालाही प्रवेश नसल्याने तिला तिचे बाळ बाहेरच ठेवावे लागले.

आपल्या नवऱ्याजवळ बाळ देऊन ती महिला परीक्षा देण्यासाठी आत गेली. वडील आपल्या बाळाला घेऊन बाहेर थांबले असताना त्या बाळाने रडायला सुरुवात केली. त्या बाळाचे रडणं वडिलांना देखील थांबवता येत नव्हतं.

तेव्हा परीक्षा केंद्रावर असणाऱ्या महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्या बाळाला आपल्या कुशीत घेतलं. त्याला खेळवत शांत करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या आईची परीक्षा संपेपर्यंत त्या बाळाला मायेची ऊब देण्याचा प्रयत्न देखील त्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी केला.

ड्युटीवर असताना देखील त्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या बाळाला सांभाळलं. तिच्या याच मायाळू पणाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.