Asim Sarode : बाळासाहेब ठाकरेंचं नाव आणि फोटो वापरण्याचा शिंदे गटाला पूर्ण अधिकार; अॅड. असीम सरोदेंनी सांगितला कायदा

ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीचे काम सार्वजनिक आणि सामाजिक होते, त्यावेळी ती व्यक्ती केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित राहत नाही. बाळासाहेब ठाकरे हे सामाजिक आणि राजकीय व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे कायदेशीर असे कोणतेही बंधन नाही, असे असीम सरोदे म्हणाले.

Asim Sarode : बाळासाहेब ठाकरेंचं नाव आणि फोटो वापरण्याचा शिंदे गटाला पूर्ण अधिकार; अॅड. असीम सरोदेंनी सांगितला कायदा
बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरण्यासंबंधी कायदेशीर बाजू सांगताना असीम सरोदेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 7:21 PM

पुणे : शिंदे गटाला बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा फोटो वापरता येवू शकतो. बाळासाहेब ठाकरे हे एकाच कुटुंबाची संपत्ती नाही. असा कुठलाही कायदा नाही, ज्यामुळे बाळासाहेबांचा फोटो वापरण्यास बंदी घालता येणार, असे स्पष्ट मत अॅड. असीम सरोदे (Asim Sarode) यांनी मांडले आहे. ते पुण्यात बोलत होते. सध्या राज्यात शिवसेनेतील बंडखोर नेते आणि शिवसेनेची झालेली अवस्था तसेच धनुष्यबाण आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो या सर्वांवरून राजकारण सुरू आहे. शिवसेनेतील बंडखोर नेते सातत्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा, फोटोचा वापर करीत आहेत. तर शिवसेनेतर्फे त्याला आक्षेप घेतला जात आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही आपल्या मुलाखतीतून बंडखोरांना इशारा दिला आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोऐवजी स्वत:च्या आई-वडिलांचा फोटो वापरण्याचे म्हटले आहे. यासंबंधी कायद्याच्या दृष्टीकोनातून सरोदे बोलत होते.

‘राज ठाकरेही वापरत होते बाळासाहेबांचा फोटो’

ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीचे काम सार्वजनिक आणि सामाजिक होते, त्यावेळी ती व्यक्ती केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित राहत नाही. बाळासाहेब ठाकरे हे सामाजिक आणि राजकीय व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे कायदेशीर असे कोणतेही बंधन नाही, की एकनाथ शिंदे किंवा शिंदे गटातील कोणीही बाळासाहेबांचा फोटो वापरू शकतील किंवा नाही. सुरुवातीलादेखील राज ठाकरे बाळासाहेबांचा फोटो वापरत होते. आतादेखील ते बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतात, असे असीम सरोदे म्हणाले. तसेच याप्रकरणी कोणतीही कायदेशीर कारवाई शिंदे गटावर होऊ शकत नाही. त्यांना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आणि फोटो वापरण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे अलीम सरोदे यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

असीम सरोदे म्हणाले…

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

शिवसेना सोडून गेलेल्या बंडखोर नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो वापरू नयेत. तो वापरण्याचा अधिकार शिवसेनेला आहे. माझ्या वडिलांचे फोटो वापरून मते मागण्यापेक्षा सुदैवाने तुमचे आई-वडील हयात आहेत. तेव्हा त्यांचे फोटो वापरून मते मागावीत, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.