शरद पवारांच्या मतदारसंघात आता शिंदे गटाची फिल्डिंग, भाजपला मागे सारत बाजी मारणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर आलीय.

शरद पवारांच्या मतदारसंघात आता शिंदे गटाची फिल्डिंग, भाजपला मागे सारत बाजी मारणार?
Follow us
| Updated on: Nov 04, 2022 | 7:19 PM

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सध्या प्रकृती बरी नसल्याने त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिर्डीत चिंतन शिबीर आयोजित करण्यात आलंय. विशेष म्हणजे या चिंतीन शिबीरच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभाग घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यामागे महत्त्वाचं कारण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आलाय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्ष कामाला लागलाय. राष्ट्रवादीच्या गोटात या सगळ्या घडामोडी सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर आलीय.

शिंदे गट आगामी लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघात शेड्डू ठोकण्याची दाट शक्यता आहे. कारण शिंदे गटात त्यासंबंधिच्या हालचालींना वेग आलाय. विशेष म्हणजे या मतदारसंघाकडे भारतीय जनता पक्षाचादेखील डोळा आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात चांगलीच चुरशीची लढत बघायला मिळाली होती. भाजपकडून तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे भाजप उमेदवाराचा पराभव जरी झाला असला तरी त्यांचा उमेदवार सेकंड लीडला होता. विशेष म्हणजे 2019 च्या बारामती लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता भाजपच्या आणखी आशा पल्लवीत झालेल्या आहेत. असं असताना शिंदे गटाकडून बारामती लोकसभा मतदारसंघासाठी तयारी केली जात असल्याने अनेकांना आश्चर्यचा धक्का बसला आहे.

हे सुद्धा वाचा

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. विजय शिवतारे उद्या बारामती आणि इंदापूरचा दौरा करणार आहेत.

विजय शिवतारे इंदापुरात सकाळी कार्यकर्त्यांची बैठक तर दुपारी बारामतीत कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. या ठकीनंतर विजय शिवतारे पत्रकार परिषद घेणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ते आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीसाठी पक्षबांधणी करणार आहेत.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.