राज्यस्तरीय पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर; पंकज इंगोले, निलेश झालटे, शितल मुंडेंसह 24 पत्रकारांचा सन्मान
आचार्य बाळशास्त्री जांभेकर राज्यस्तरीय पत्रकार भूषण पुरस्कार हा पत्रकारिता क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारा पुरस्कार आहे. पुण्यातील निगडी परिसरातील ग. दि. माडगूळकर सभागृहामध्ये हा पुरस्कार वितरणाचा सोहळा पार पडला. यावेळी अनेक दिग्गज पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
दरवर्षी 6 जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जात आहे. या पत्रकार दिनानिमित्ताने काल आचार्य बाळशास्त्री जांभेकर राज्यस्तरीय पत्रकार भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, पिंपरी चिंचवड पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. पुण्यातील निगडी परिसरातील ग. दि. माडगूळकर सभागृहामध्ये हा पुरस्कार वितरणाचा सोहळा पार पडला. यावेळी अनेक दिग्गज पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
पत्रकारिता क्षेत्रातील अत्यंत मानाचा पुरस्कार
आचार्य बाळशास्त्री जांभेकर राज्यस्तरीय पत्रकार भूषण पुरस्कार हा पत्रकारिता क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारा पुरस्कार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि कामगार मंत्री आकाश फुंडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत होते. यावेळी 27 पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर राज्यस्तरीय पत्रकार भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कोणाकोणाला पुरस्कार जाहीर?
यात कॅलिडस मीडियाचे संचालक पंकज इंगोले, ABP माझाचे प्रतिनिधी उमेश अलोने, झी २४ तासाचे सिनिअर कॉरस्पॉण्डेन्ट प्रताप राजाराम नाईक यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर राज्यस्तरीय पत्रकार भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यासोबतच ABP माझाच्या प्रतिनिधी सोनाली शिंदे, मुंबई तकचे प्रोड्युसर निलेश झालटे आणि महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनच्या प्रतिनिधी शितल मुंडे यांसह 27 जणांना सन्मानित करण्यात आले.