हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा शिवसेना आणि भाजपा युती होऊ शकते, गिरीश बापटांना विश्वास

Shiv Sena BJP Yuti : तुमची आमची नैसर्गिक युती आहे. पण मधल्या काळात कृत्रिम लोकांनी ती तोडली. पण भविष्यात अशी युती झाली तर भाजपच्या कार्यकर्त्यांनाही आनंद होईल, असं गिरीश बापट म्हणाले.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा शिवसेना आणि भाजपा युती होऊ शकते, गिरीश बापटांना विश्वास
गिरीश बापट
Follow us
| Updated on: Jun 21, 2021 | 12:35 PM

पुणे : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik letter) यांनी पुन्हा भाजपसोबत जुळवून घेण्याबाबतचं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिल्यानंतर, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. कारण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजपा (Shiv Sena BJP yuti) युती होऊ शकते, आता शिवसेनेनं हा निर्णय घ्यायचा आहे, असं रोखठोक भाष्य भाजपचे पुण्यातील खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांनी केलं आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. (Shiv Sena and BJP can form an alliance in Maharashtra on the issue of Hindutva, said BJP MP Girish Bapat in Pune)

पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेला सोबत घेण्यासाठी आम्ही प्राधान्य देणार आहे. महापालिकेत शिवसेना भाजपा युती होऊ शकते, पुणे महापालिका निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा आम्ही शिवसेनेला प्राधान्य देऊ, असंही खासदार गिरीश बापट म्हणाले.

गिरीश बापट नेमकं काय म्हणाले?

भाजप-सेनेची युती ही हिंदुत्वावर होती. ती पुढेही होऊ शकते. कारण हिंदुत्व हा आपला श्वास आहे. कारण मला असं वाटतंय ही सर्वांच्या मनातील बोलकी प्रतिक्रिया आहे. प्रताप सरनाईक सर्वांच्या मनातील बोलले आहेत. भविष्यात युती होऊ शकते.  राजकीय जीवनात अशा गोष्टी घडत असतात. भाजपने याआधीही सांगितलं होतं, तुमची आमची नैसर्गिक युती आहे. पण मधल्या काळात कृत्रिम लोकांनी ती तोडली. पण भविष्यात अशी युती झाली तर भाजपच्या कार्यकर्त्यांनाही आनंद होईल, असं गिरीश बापट म्हणाले.

प्रताप सरनाईक सर्वांच्या मनातलं बोलले

प्रताप सरनाईक हे सगळ्यांच्या मनातलं बोलले आहेत. आता शिवसेनेनं हा निर्णय घ्यायचा आहे. भविष्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजपा युती होऊ शकते, असं गिरीश बापट म्हणाले.

पुण्यात दोन दिवसापूर्वी सकाळच्या बैठकीत अजित पवार म्हणाले होते गर्दी जमली तर 15 दिवस क्वारंटाईन करेन, आणि नंतर म्हणतात की कार्यकर्ते माझं ऐकत नाहीत. दादा शरद पवारांचं ऐकत नाहीत हे मला माहित होतं, मात्र दादांचं कार्यकर्ते ऐकत नाहीत हे मी पहिल्यांदाच ऐकतोय, असं गिरीश बापटांनी सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा मी पक्ष मानत नाही. ती एक पश्चिम महाराष्ट्रातील पार्टी आहे. पुणे महापालिकेत दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. महापालिकेत भाजपाचं सत्तेत येणार, असं म्हणत गिरीश बापटांनी अजित पवारांना डिवचलं.

प्रताप सरनाईक यांचं पत्र 

ईडीचा ससेमिरा मागे लागल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात गेलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिलं आहे. या पत्रात प्रताप सरनाईक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना कमकुवत करत असल्याचा दावा करतानाच भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन केलं आहे. भाजपशी युती केल्यावर शिवसेनेला फायदा होईलच. शिवाय आमच्या सारख्यांना होणारा त्रासही वाचेल, असा दावाही सरनाईक यांनी केला आहे.

VIDEO : गिरीश बापट नेमकं काय म्हणाले?

संबंंधित बातम्या 

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडण्यासाठी फुल्ल परवानगी, पण शिवसेनेला हात लावायचा नाही हे ठरलंय : हसन मुश्रीफ

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.