पवारांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची पक्षबांधणी, आधी भाजप, नंतर शिंदे आता शिवसेना, बारामतीत कोण बाजी मारणार?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' या निवासस्थानी उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे.

पवारांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची पक्षबांधणी, आधी भाजप, नंतर शिंदे आता शिवसेना, बारामतीत कोण बाजी मारणार?
Follow us
| Updated on: Nov 06, 2022 | 7:16 PM

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या बारामती मतदारसंघाकडे भाजपचा आधीपासून डोळा आहे. विशेष म्हणजे भाजप पाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट देखील या मतदारसंघात आपले पाळंमुळं रोवू पाहतोय. दरम्यान, शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्याबाबतची बातमी ताजी असताना शिवसेनेच्या ठाकरे गटातून महत्त्वाची बातमी समोर आलीय.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाविषयी चर्चा होणार आहे. ही बैठक उद्या दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आलीय. या बैठकीला पुणे जिल्ह्यातील पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी हजेरी लावणार आहेत. यामध्ये शहराध्यक्ष आणि उपनेते यांचा समावेश असेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळालीय. या बैठकीत उद्धव ठाकरे मतदारसंघाची स्थिती जाणून घेणार आहेत.

राज्यात सध्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन मित्रपक्ष आहेत. हे तीनही पक्ष सध्या विरोधी बाकावर बसले आहेत. पण तीन महिन्यांपूर्वी अडीच वर्षे या तीनही पक्षांच्या महाविकास आघाडीचं राज्यात सरकार होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40, अपक्ष आणि मित्र पक्षाचे 10 आमदार अशा एकूण 50 आमदारांची सोबत घेऊन भाजपसोबत हातमिळवणी केल्याने महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं होतं.

हे सुद्धा वाचा

महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर आता आघाडीतील प्रत्येक पक्ष आपापल्या पक्षाला बळकट करण्यास प्राधान्य देतोय. शिवसेना पक्षात मोठी फूट पडलीय. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि इतर पदाधिकाऱ्यांकडून पक्षाला बळकट करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत.

विशेष म्हणजे शिवसेनेचा ठाकरे गट आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघाकडे देखील लक्ष ठेवून आहे. म्हणूनच उद्धव ठाकरेंनी तेथील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावल्याची चर्चा आहे. पण बारामती मतदारसंघ हा शरद पवारांचा बालेकिल्ला असल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केला जातोय.

बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मजबूत पकड आहे. पण गेल्या काही वर्षांपासून त्या मतदारसंघात भाजप आपले पाय पसरवताना दिसतोय. या मतदारसंघात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार हा दुसऱ्या लीडला होता. त्यामुळे भाजपच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

आगामी निवडणुकीसाठी भाजपने बारामती मतदारसंघासाठी आधीच रणनीती आखली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतंच या मतदारसंघाचा दौरा केला होता. तसेच या मतदारसंघात भाजपचे अनेक दिग्गज नेते दौऱ्यासाठी येण्याची चिन्हं आहेत. असं असताना शिंदे गटही या मतदारसंघात लक्ष देतोय. त्यानंतर उद्धव ठाकरेही या मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे आगामी काळात बारामती लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.