Pune Sanjay Raut : राज ठाकरे यांच्या हातानं भाजपानं हिंदुत्वाचा गळा घोटला; पुण्यात संजय राऊत यांची चौफेर फटकेबाजी

भाजपाला नेमके कोणत्या दिशेला जायचे आहे, ते कळत नाही. भाजपा हा पक्ष गोंधळलेला स्थितीत आहे. देवेंद्र फडणवीस एकीकडे, रावसाहेब दानवे एकीकडे ते एकमेकांच्या तंगडीत तंगडी घालत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Pune Sanjay Raut : राज ठाकरे यांच्या हातानं भाजपानं हिंदुत्वाचा गळा घोटला; पुण्यात संजय राऊत यांची चौफेर फटकेबाजी
भाजपा, राज ठाकरेंवर टीका करताना संजय राऊतImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 4:40 PM

पुणे : राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भूमिका हिंदुत्वाच्या विरोधात आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे शिर्डीच्या साई मंदिरात, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात काकड आरती होऊ शकली नाही, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. मेळाव्याच्या निमित्ताने पुण्यात आले असता बोलत होते. ते म्हणाले, की राज ठाकरे चांगले व्यंगचित्रकार (Cartoonist) होते, मात्र भाजपाने त्यांच्या व्यंगचित्राचा गळा घोटला आहे. तसेच भोंग्यांच्या प्रकरणामुळे भाजपाने राज ठाकरे यांच्या हाताने हिंदुत्वाचा गळा घोटलाय, असा आरोप त्यांनी केला. भाजपाला नेमके कोणत्या दिशेला जायचे आहे, ते कळत नाही. भाजपा हा पक्ष गोंधळलेला स्थितीत आहे. देवेंद्र फडणवीस एकीकडे, रावसाहेब दानवे एकीकडे ते एकमेकांच्या तंगडीत तंगडी घालत आहेत, अशी टीका त्यांनी केली. अनेक व्यंगचित्रकारांना आता लाइनही वाचत येत नाही आणि काही लाइनही बदलतात, असा टोला त्यांनी लगावला.

‘…आणि लाइन बददली’

बाळासाहेब ठाकरे राजकारणी आणि व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्धीस आले. त्यांना कोणत्याही भाडोत्री भोंग्याची गरज लागली नाही. पण भाजपाने व्यंगचित्रकलेचा गळा घोटला आहे. देशात सध्या जे काही चालले आहे, त्यावर भाष्य करण्याची क्षमता व्यंगचित्रकलेत आहे. पण ज्यांच्यामध्ये व्यंगचित्रकलेची ही क्षमता आहे, त्यांनी व्यंगचित्रकला सोडून भोंग्यांचे राजकारण सुरू केले आणि लाइन बददली, असा टोला यावेळी लगावला. ब्राह्मण मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावरून संजय राऊत यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली आहे.

‘सर्वच पक्षांची धावपळ’

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची ताकत जास्त आहे. येथे महाविकास आघाडीने जोर लावल्यास सत्ता येवू शकते. तसेच महाविकास आघाडी बहुतेक महापालिकांवर सत्तेवर येऊ शकते, असेही ते म्हणाले आहेत. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निर्णय पुढील दोन आठवड्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका जाहीर करण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले, की कोर्टाच्या निकालामुळे सर्वच पक्षांची धावपळ झाली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.