महापालिकेच्या 80 जागा लढवू, पुण्यात जाऊन संजय राऊतांची घोषणा

पुण्यातील आगामी निवडणुकीत शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या एकेरी राहणार नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. | Sanjay Raut Pune Mahanagarpalika election

महापालिकेच्या 80 जागा लढवू, पुण्यात जाऊन संजय राऊतांची घोषणा
शिवसेना खासदार संजय राऊत
Follow us
| Updated on: Jun 05, 2021 | 2:48 PM

पुणे: शिवसेना पक्षाकडून पुण्यातील संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. आगामी महानगरपालिकेची निवडणूक महाविकासआघाडीने एकत्र लढवली तरी शिवसेना 80 जागांवर लढेल, अशी घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. सध्या शिवसेना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी संघटनात्मक काम करत आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जनमानसातील प्रतिमा दिवसेंदिवस उंचावत आहे. त्यामुळे पुण्यातील आगामी निवडणुकीत शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या एकेरी राहणार नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. (Shivsena MP Sanjay Raut on Pune Mahanagarpalika election)

ते शनिवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना किंग आणि किंगमेकर यापैकी एक नक्कीच असणार. पुण्याकडे आमचं लक्ष आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

‘चंद्रकांत पाटील म्हणजे वसंतदादा पाटील नव्हेत’

शरद पवार यांच्यावर टीका करणे आजकाल फॅशन झाली आहे. चंद्रकांत पाटील म्हणजे वसंतदादा पाटील नव्हेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

‘सत्ता असली किंवा नसो आमच्यासाठी शिवसेना महत्वाची’

खेडमधील राष्ट्रवादी आणि शिवसेना वादावरही संजय राऊत यांनी भाष्य केले. सत्ता असली किंवा नसो आमच्यासाठी शिवसेना महत्त्वाची आहे. त्यामुळे जिथे शिवसेनेवर अन्याय होईल, तिथे आम्ही उभे राहणारच, असे संजय राऊत यांनी सांगितले.

राज-उद्धव एकत्र येणार का, राज म्हणाले परमेश्वराला ठाऊक, आता संजय राऊतांचं मोठं विधान

राजकारण हे आपलं आपण करायचं असतं. राजकारणात परमेश्वरावर विसंबून राहणाऱ्या व्यक्तीला स्वत: परमेश्वरही मदत करत नाही, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंना लक्ष्य केले. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत राज ठाकरे (Raj Thackeray) यांना भविष्यात शिवसेना-मनसे एकत्र येणार का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर राज ठाकरे यांनी ‘परमेश्वराला ठाऊक’, असे मोघम उत्तर दिले होते. (Shivsena MP Sanjay Raut take a dig at MNS chief Raj Thackeray)

याविषयी संजय राऊत यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी राज ठाकरे यांना चिमटा काढला. परमेश्वर हा कुठल्याही पक्षाचा मेंबर नसतो, तो कधीच मध्यस्थाची भूमिका घेत नाही. त्यामुळे अशा गोष्टी या परमेश्वरावर सोडून द्यायच्या नसतात. जो परमेश्वरावर विसंबून राजकारण करतो त्याला स्वत: परमेश्वरही मदत करत नाही. राजकारण हे आपलं आपण करायचं असतं, असे संजय राऊत यांनी म्हटले. संजय राऊत यांच्या या तिखट भाषेतील टीकेला ‘मनसे’कडून काय प्रत्युत्तर देण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संबंधित बातम्या:

राज-उद्धव एकत्र येणार का, राज म्हणाले परमेश्वराला ठाऊक, आता संजय राऊतांचं मोठं विधान

निवडणुका प्रतिकांवर होतात; मोदींमुळे भाजप तर बाळासाहेबांमुळे शिवसेना सत्तेत: राज ठाकरे

(Shivsena MP Sanjay Raut on Pune Mahanagarpalika election)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.