MLA Ram Satpute :भाजप आमदार राम सातपुतेंच्या गाडीला अपघात ; ट्विट करत दिली माहिती

भाजप आमदार राम सातपुते याच्या गाडीला माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या अपघातातून राम सातपुते व सोबत असलेले सहकारी बचावले आहेत.  अपघातात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. अपघाताची घटना घडल्यानंतर राम सातपुते यांनी आपल्या फेसबुक व ट्विटरवर ट्विट करून ही माहिती दिली आहे

MLA Ram Satpute :भाजप आमदार राम सातपुतेंच्या गाडीला अपघात ; ट्विट करत दिली माहिती
MLA Ram Satpute Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 5:37 PM

पुणे – अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारला अपघात झालेल्याची घटना ताजी असतानाच, आता माळशिरसमधील (Malshiras) भाजप आमदार राम सातपुते (MLA Ram Satpute)यांच्या गाडीला अपघात  झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राम सातपुते यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर(Twitter) हॅन्डलवरून ट्विट करत ही माहिती दिली आहे. ‘अकाल मृत्यु वो मरे जो काम करे चांडाल का, काल भी उसका क्या करे जो भक्त हो महाकाल का आज माझ्या गाडीला अपघात झाला पण मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने मी व माझे सर्व सहकारी सुखरूप आहेत. काळजी करु नका ‘ असे ट्विट त्यांनी केले आहे. अपघातात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. अपघाताची घटना घडल्यानंतर राम सातपुते यांनी आपल्या फेसबुक व ट्विटरवर ट्विट करून ही माहिती दिली आहे. याबरोबरच माझ्या मतदार संघातील जनतेच्या आशीर्वादामुळे मी सुखरूप असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ट्विटरवर ट्विट करत दिली माहिती

नेमक काय घडलं

भाजप आमदार राम सातपुते याच्या गाडीला माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या अपघातातून राम सातपुते व सोबत असलेले सहकारी बचावले आहेत.  अपघातात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. अपघाताची घटना घडल्यानंतर राम सातपुते यांनी आपल्या फेसबुक व ट्विटरवर ट्विट करून ही माहिती दिली आहे. याबरोबरच माझ्या मतदार संघातील जनतेच्या आशीर्वादामुळे मी सुखरूप असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नेमका हा अपघात कसा झाला. याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही .

फेसबुकवर पोस्ट लिहीत दिली माहिती

कोण आहेत राम सातपुते

आमदार राम सातपुते हे माळशिरस तालुक्यातील भांबुर्डी येथील रहिवासी आहेत. त्यांचे मूळ गाव बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव-बीड रोडवरील डोईठाण हे आहे. त्यांचे वडील विठ्ठल सातपुते हे शंकर सहकारी कारखान्यात ऊसतोड कामगार होते. त्यांची आई जिजाबाई या सुद्धा शेतता मोलमजुरी करायच्या. 1990 ते 1995 ही पाच वर्षे विठ्ठल सातपुते यांनी या साखर कारखान्यासाठी ऊसतोडणीचे काम केले होते. परंतु मुलाला चांगलं शिक्षण मिळावं, आपला मुलगा ऊसतोड कामगार होऊ नये. म्हणून त्यांनी राम यांना पुण्यात शिक्षणासाठी पाठवलं होतं. राम यांनी पुण्यात राहून मुद्रण तंत्र पदविका आणि पदवीचे शिक्षण घेतलं आहे. विठ्ठल सातपुते आजही त्यांच्या गावी चपला शिवायचे दुकान चालवतात.अत्यंत खडतर परिस्थितीतून पुढेआलेल्या सातपुते यांनी महाविद्यालयीन जीवनात अभाविपच्या संपर्कात आले. तेथून त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली. सातपुते यांनी माळशिरस मतदारसंघातून राष्ट्रवादीचे मातब्बर उमेदवार उत्तमराव जानकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली. कुशल संघटन कौशल्य, मतदारसंघाची जाण, प्रश्नांची समज आणि अमोघ वक्तृत्वाच्या बळावर सातपुते यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत जानकरांना पराभवाची धूळ चारली आणि आयुष्यातील पहिला दणदणीत आणि खणखणीत विजय नोंदवला. सातपुते यांना 1 लाख 3 हजार 507 मते मिळाली. तर जानकर यांना 1 लाख 917 मते मिळाली.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.