State Minister Datta Bharne| राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा साधेपणा; पंगतीत बसून दत्तामामांनी मटणावर मारला ताव

जे काम करायचे ते सर्वसामान्य जनतेसाठी, मागासवर्गीय लोकांसाठी, अल्पसंख्याक लोकांसाठी करायचे व हीच जनता नेहमी माझ्या पाठीशी आहे, मी "शो" बाज नाहीये, माझ्या पाठीशी इनोव्हा, मर्सडीज गाडीतली लोकं नसून, जे सर्वसामान्य आहेत बोलेरो व फटफटीवर (दुचाकी) असतात हीच जनता कायम माझ्या पाठीशी आहे

State Minister Datta Bharne| राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा साधेपणा; पंगतीत बसून दत्तामामांनी मटणावर मारला ताव
State Minister Datta Bharne
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 8:06 PM

इंदापूर- राजकीय नेता असूनही कायम आपल्या साधेपणाने माणसांची मने जिंकणारे नेते म्हणून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (State Minister Datta Bharne) प्रसिद्ध आहेत. आपल्या कृतीतून वर्तनातून अनेक दिसून आले आहे. मग तो यात्रेत कार्यर्त्यांच्या आग्रहखातर नाचणे असो, लग्नाला उपस्थिती असो. अशी घटना इंदापूर(Indapur) तालुक्यातील निरवांगी (Nirvangi) या गावी काल गुरुवारी सायंकाळी 30  कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आला. या झालेल्या समारंभानंतर जेवणचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी गावकऱ्यांच्या पंगती बसल्या होत्या, व उपस्थित पदाधिकाऱ्यांना जेवणासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. मात्र राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी चक्क गावकऱ्यांच्या सोबत पंगतीत बसून जेवणाचा आस्वाद घेतला. यामुळे भरणे यांचा साधेपणा पुन्हा समोर आला आहे.

जनता नेहमीच माझ्या पाठीशी

“जे काम करायचे ते सर्वसामान्य जनतेसाठी, मागासवर्गीय लोकांसाठी, अल्पसंख्याक लोकांसाठी करायचे व हीच जनता नेहमी माझ्या पाठीशी आहे, मी “शो” बाज नाहीये, माझ्या पाठीशी इनोव्हा, मर्सडीज गाडीतली लोकं नसून, जे सर्वसामान्य आहेत बोलेरो व फटफटीवर (दुचाकी) असतात हीच जनता कायम माझ्या पाठीशी आहे”, असं नेहमीच भरणे भाषणात सांगून माझे पाय कायम जमिनीवरच असतात, हे ते नेहमीच दाखवून देत असतात.. त्याचीच गुरुवारी प्रचितीच जणू आली. या कार्यक्रमात अनेक पदाधिकारी यांसह गावातील ज्येष्ठ नागरिक आदींची उपस्थिती होती..

नवरदेवाचे मामा बनल्याचा व्हिडिओही चांगलाच व्हायरल

यापूर्वी इंदापूर तालुक्यातील सराटी येथील एका विवाह समारंभाला दत्तात्रेय भरणे यांनी हजेरी लावली होती. सराटी येथील भैय्यासाहेब कोकाटे यांच्या लग्न समारंभाला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे सहकुटुंब सहपरिवार उपस्थित होते. नवरदेवाला सख्खा मामा नसल्याने तुम्हीच नवरदेवाचे मामा व्हा, अशी विनंती कोकाटे कुटुंबाने राज्यमंत्र्यांना केली होती. त्यांनीही क्षणाचाही विलंब न लावता कोकाटे कुटुंबीयांच्या विनंतीला मान दिला. स्वतः नवरदेवाच्या मागे उभा राहून राज्यमंत्री भरणे नवरदेवाचे मामा बनले. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झाला आहे.

शिवजयंतीनिमित्त ‘सेर सिवराज है’गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, गायक दिव्य कुमार याच्या आवाजात शिवरायांना नमन

रब्बी हंगाम : रात्री अखंडीत अन् दिवसा अनियमित विद्युत पुरवठा, सांगा शेती करायची कशी?

शाळेतील गीता पठणावरून वाद, भाजपच्या मागणीला समाजवादी पार्टीचा तीव्र विरोध; महापौरांना लिहिलं पत्रं

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.