कॅनमध्ये अडकलेल्या सापाची पिंपरी चिंचवडमध्ये सुखरुप सुटका

सचिन चपळगावकर, टीव्ही 9 मराठी, पिंपरी चिंचवड : कुठेही साप दिसला तर घटनास्थळाहून पळ काढला जातो किंवा सापाला हुसकावण्याचा आणि मारण्याचा प्रयत्न केला जातो. खुप कमी लोक असे असतात, जे सर्पमित्राला बोलावतात आणि सापाची सुखरुप सुटका करतात. असाच एक प्रसंग पिंपरी चिंचवडमध्येही पाहायला मिळाला. अडचणीत असलेल्या सापाची सर्पमित्रांकडून सुटका करण्यात आली. पिंपरी चिंचवडमधील वाईल्ड अॅनिमल्स […]

कॅनमध्ये अडकलेल्या सापाची पिंपरी चिंचवडमध्ये सुखरुप सुटका
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM

सचिन चपळगावकर, टीव्ही 9 मराठी, पिंपरी चिंचवड : कुठेही साप दिसला तर घटनास्थळाहून पळ काढला जातो किंवा सापाला हुसकावण्याचा आणि मारण्याचा प्रयत्न केला जातो. खुप कमी लोक असे असतात, जे सर्पमित्राला बोलावतात आणि सापाची सुखरुप सुटका करतात. असाच एक प्रसंग पिंपरी चिंचवडमध्येही पाहायला मिळाला. अडचणीत असलेल्या सापाची सर्पमित्रांकडून सुटका करण्यात आली.

पिंपरी चिंचवडमधील वाईल्ड अॅनिमल्स स्नेक प्रोटेक्शन सोसायटीला आपल्या हद्दीलगत असलेल्या चांदखेड आणि बेबड ओव्हळ या दोन गावाच्या दरम्याच्या परिसरात धामण जातीच्या सापाचं तोंड अल्युमिनिअमच्या कॅनमध्ये अडकलेलं दिसलं. विशाल माळी यांनी रुग्णाला घेऊन जात असताना हा सर्व प्रकार पाहिला.

विशाल माळी यांनी त्या क्षणाला सापाची सुटका करण्याचा निर्धार केला. तुषार पवार, नितीन, दीपक कांबळे या व्हॉट्सअप ग्रुपमधील सदस्यांना त्यांनी याबाबत माहिती दिली. या सर्वांनी साप आढळलेल्या ठिकाणी जाऊन त्याचा शोध घेतला. मोठ्या प्रयत्नानंतर धामणीला शोधण्यात आलं.

गणेश भूतकर, शेखर जांभुळकर, प्रकाश काकडे, तुषार पवार या सर्वांनी आवश्यकतेनुसार सुरक्षित वस्तूंचा वापर करत सापाला कोणतीही इजा न होऊ देता, त्याची सुटका केली.

साप दिसताच त्याला मारणारे किंवा हाकलून देणारे अनेक जण आपण पाहतो. मानवाच्या या धोरणामुळे अनेक जाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळेच साप दिसताच न घाबरता अगोदर सर्पमित्राला बोलावणं आणि सापाला योग्य ठिकाणी मानवी वस्तीपासून दूरवर नेऊन सोडणं हा उत्तम पर्याय आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.