राजकारणी कुणाच्या थोबाडीत मारायची यात अडकले, त्यांना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही : बाबा आढाव

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी महामार्गांसाठी होत असलेल्या भूसंपादनाच्या प्रश्नांवर बोलताना राजकारण्यांवर सडकून टीका केली. राजकारणी कुणाच्या थोबाडीत मारायची यातच अडकले आहेत. त्यांना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असा आरोप केलाय.

राजकारणी कुणाच्या थोबाडीत मारायची यात अडकले, त्यांना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही : बाबा आढाव
Follow us
| Updated on: Aug 27, 2021 | 3:14 PM

पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी महामार्गांसाठी होत असलेल्या भूसंपादनाच्या प्रश्नांवर बोलताना राजकारण्यांवर सडकून टीका केली. राजकारणी कुणाच्या थोबाडीत मारायची यातच अडकले आहेत. त्यांना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असा आरोप केलाय. तसेच पुनर्वसनात योग्य मोबदला मिळण्यासाठी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास मंत्र्यांना तालुक्यात फिरू देणार नाही, असा इशारा दिलाय. ते पुण्यात बोलत होते.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव म्हणाले, “राजकारणी कुणाच्या थोबाडीत मारायची याच्यात अडकले आहेत. मात्र, त्यांना रिंगरोडला विरोध होत असताना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. शेतकऱ्यांची औलाद आहे, एक इंचही जमीन देणार नाही. या आंदोलनाची दखल घेतली नाहीतर, मंत्रालयावर मोर्चा काढू. मंत्र्यांना तालुक्यात फिरू देणार नाही.”

“नितीन गडकरींनी गावागावात फिरावं, शेतकरी एकही दगड मारणार नाही”

“नितीन गडकरींनी रस्त्यांसाठी भूसंपादन केल्यावर पुनर्वसनासाठी योजना आणायला हवी. त्यांनी गावागावात फिरावं. मी त्यांना घेऊन फिरेल. यावेळी एकही शेतकरी दगड मारणार नाही याची जबाबदारी मी घेतो,” अशी भूमिका बाबा आढावा यांनी पुण्यात मांडलीय.

“पुणे शहरालगत 6 तालुक्यातून रिंग रोड प्रस्तावित, बाधिक शेतकऱ्यांचा विरोध”

पुणे शहरालगत 6 तालुक्यातून रिंग रोड प्रस्तावित आहे. त्याला विरोध करण्यासाठी पुण्यातील विधानभवन येथे बाधित शेतकरी एकवटले होते. 6 तालुक्यातील 84 गावातील एकूण 1872 हेक्टर जमीन अधिग्रहीत केली जाणार आहे. उर्वरीत 115 हेक्टर जंगल जमीन आहे.

संबंधित व्हिडीओ पाहा :

हेही वाचा :

मनुवादी व्यवस्था आणि संविधान एकाच वेळी वाटचाल करू शकणार नाही : डॉ. बाबा आढाव

वर्षातील 12 महिने चिखलातून प्रवास, शहापूरमधील ‘या’ गावात स्वातंत्र्यापासून आजपर्यंत रस्ताच नाही

पुण्यातील 23 नव्या गावांमधील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेचा पुढाकार; 5 कोटींचा निधी मंजूर

Social Activist Baba Adhav criticize politician over negligence for farmer in Pune

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.