माढ्याच्या सुलतानपूरमध्ये 21 वर्षी रोहन धुमाळच्या गळ्यात सरपंचपदाची माळ

माढा तालुक्यातील सुलतानपूरच्या रोहन हनुमंत धुमाळ या 21 वर्षीय तरुणाची सरपंचपदी निवड झाली आहे. ( Rohan Dhumal Sultanpur Village)

माढ्याच्या सुलतानपूरमध्ये 21 वर्षी रोहन धुमाळच्या गळ्यात सरपंचपदाची माळ
रोहन धुमाळ, सरपंच, सुलतानपूर
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 6:45 PM

सोलापूर: राजकारणात आजची तरुणाई सहभागी होत असल्याचं ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून आले होते. गावोगावच्या तरुणांची सरपंचपदी वर्णी लागली आहे. सोलापूरच्या माढा तालुक्यातील सुलतानपूरच्या रोहन हनुमंत धुमाळ या 21 वर्षीय तरुणानं तरुणाने ग्रामपंचायतीचे मैदान मारत गावचे सरपंच पद देखील पटकावले आहे. वयाच्या 21 व्या वर्षी गावचे सरपंचपद काबीज केल्याने रोहन सर्वात कमी वयाचा सरपंच म्हणून सोलापूर जिल्ह्यात चर्चेला आलाय. तर, गावातील कल्पना अनिल शिंदे या महिलेला उपसरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. (Solapur Madha Rohan Dhumal elected as Sarpanch at 21 years of Sultanpur Village)

महाविकास आघाडीच्या पॅनेलमधून विजयी

26 /11 च्या मुंबई च्या दहशतवादी हल्ल्यात सुलतानपूरचे राहुल शिंदे यांनी हौतात्म्य पत्करल्याने सुलतानपूर गावाला विशेष महत्व आहे. याच गावचे नाव आता रोहनच्या कमी वयाच्या सरपंच निवडी वरुन समोर आले आहे. गावाच्या विकासाचे व्हिजन घेऊन गावचा कायापालट करणार असल्याचा निर्धार रोहनराज धुमाळ याने केला आहे. अनेक वर्षापासून गावाचे नामांतर राहुलनगर करण्याचा विषय प्रशासकीय पातळीवर अडकून पडला आहे. तो प्रश्न मार्गी लावणार असल्याचे रोहनने सांगितले. गावात प्रभाग क्र 1 मधून रोहन याने महाविकास आघाडीच्या पॅनल मधून निवडणूक लढवली होती. तो ९६ मतांनी विजय देखील झाला होता.

रोहन धुमाळ माढ्यातील रयत शिक्षण महाविद्यालयात शिक्षण घेत शेती करतो आहे. आता रोहनच्या खांद्यावर आणखी एक जबाबदारी आली असून शिक्षण,शेती बरोबरच त्याला गावचा कारभार हाकावा लागणार आहे. कसलाही राजकीय वारसा नसतानाही या सामान्य शेतकरी दाम्पंत्याच्या मुलाने राजकारणाच्या पहिल्याच इनिंगमध्ये यश मिळवलय. रोहन धुमाळवर नव्या जबाबदारीनिमित्त अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रोहनच्या निवडीमुळे त्याची आई सुनिता अन वडील हनुमंत आनंदाश्रू आवरता आले नाहीत.

मुलाची 21 व्या वर्षी सरपंचपदी निवड झाली या गोष्टीचा आनंद झालाय, असं हनुमंत धुमाळ यांनी सांगितले. तरुण आणि ग्रामस्थांनी रोहनला सरपंचपदाची संधी दिली त्यांचे आभार मानतो, असे रोहनचे वडील म्हणाले.

संबंधित बातम्या

अजितदादांच्या मनात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी ‘ती’ भाषा शिकणार: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

उत्तर मुंबई भाजपच्या अल्पसंख्याक सेलचा अध्यक्ष चक्क बांगलादेशी, सचिन सावंतांचा भाजपवर हल्लाबोल

(Solapur Madha Rohan Dhumal elected as Sarpanch at 21 years of Sultanpur Village)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.