सिद्धरामेश्वर यात्रा होणार की नाही? विभागीय आयुक्त घेणार अंतिम निर्णय

| Updated on: Dec 30, 2020 | 10:35 AM

सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धरामेश्वराची यात्रा होणार की नाही? याबाबतचा अंतिम निर्णय आज सोलापूरचे विभागीय आयुक्त सौरभ राव घेणार आहेत.

सिद्धरामेश्वर यात्रा होणार की नाही? विभागीय आयुक्त घेणार अंतिम निर्णय
Follow us on

सोलापूर सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धरामेश्वराची यात्रा होणार की नाही? याबाबतचा अंतिम निर्णय आज सोलापूरचे विभागीय आयुक्त सौरभ राव घेणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान कमिटी आणि कमीत कमी भक्तांच्या उपस्थितीत ही यात्रा पडावी, असा प्रशासनाचा प्रयत्न आहे. (Solapur Sidhharameshwar yatra final decision will be taken by the Divisional Commissioner Saurabh Rao)

यात्रेबाबतचा सकारात्मक निर्णय घेण्यासाठी आ.संजय शिंदे ,आ. विजयकुमार देशमुख यांच्यासह शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांची भेट घेतलीय. सिद्धेश्वर यात्रेतील महत्वाच्या धार्मिक विधींना परवानगीबाबत यावेळी निर्णय होणार आहे. मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त तसंच जिल्हाधिकारी यांच्याशी आज चर्चा करुन आज (बुधवार) विभागीय आयुक्त सौरभ राव अंतिम निर्णय घेणार आहेत.

शासनदरबारी झालेल्या निर्णयानुसार यात्रा व्हावी की नाही याबाबतचे सर्वाधिकार विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यानुसार कमीत कमी भक्तांमध्ये कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी योग्य त्या प्रकारे काळजी घेऊन शासनाच्या निर्णयाला देवस्थान कमिटी सहकार्य करेल, असं सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी सांगितलंय.

यात्रेचा अंतिम निर्णय अपेक्षित

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या सर्व सूचना आणि नियमांचं पालन करुन साडे नऊशे वर्षांची परंपरा असलेल्या सिद्धेश्वर यात्रेतील तैलाभिषेक, अक्षता सोहळा, होमवहन तसंच अन्य धार्मिक कार्यक्रम पार पाडण्यासंदर्भात देवस्थान कमिटीने प्रशासनाला सविस्तर आराखडा दिला आहे. मानाच्या सातही नंदीध्वजांच्या मिरवणुकीसह सर्व धार्मिक विधीच्यावेळी एक हजार जणांना उपस्थित रहावे, असं देवस्थान कमिटीने प्रशासनाला दिलेल्या आराखड्यात म्हटले आहे.

राज्य शासनाने यात्रेसंदर्भातील निर्णय विभागीय आयुक्तांवर सोपवला आहे. त्यानुसार विभागीय आयुक्त सौरभ राव हे मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त तसंच जिल्हाधिकारी यांच्याशी आज चर्चा करुन आज (बुधवारी) अंतिम निर्णय घेणार आहेत.

(Solapur Sidhharameshwar yatra final decision will be taken by the Divisional Commissioner Saurabh Rao)

हे ही वाचा

शिवसेनेचं बोट धरुन विधानसभेत आल्याचा सतेज पाटील यांना विसर, ‘स्वबळा’च्या आरोपांनंतर राजेश क्षीरसागर भडकले

न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी आमीर खानचा मुक्काम सिंधुदुर्गातील भोगवे बीचवर