तुम्हाला मगरीची नसबंदी कशी होते माहितीय का? सोलापुरात 20 मगरींची होणार

सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या नाल्यात किंवा दलदलीच्या भागात गेल्या काही वर्षांपासून मगरींचा वावर वाढतोय.

तुम्हाला मगरीची नसबंदी कशी होते माहितीय का? सोलापुरात 20 मगरींची होणार
Solapur Sterilization Of 20 Crocodile
Follow us
| Updated on: Feb 15, 2021 | 11:48 AM

सोलापूर : सोलापुरातील विजापूर रोडवर असणाऱ्या महात्मा गांधी प्राणीसंग्रहालयातील (Solapur Sterilization Of 20 Crocodile) वाढती मगरीची संख्या आणि त्यामुळे त्यांचे संगोपन करणे महापालिका उद्यान विभागाची मोठे डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे प्राणीसंग्रहालयातील काळवीट, चितळप्रमाणे मगरीची नसबंदी करण्याबाबत उद्यान विभागाने मार्गदर्शन मागविले आहे. शहरातील दलदलीच्या ठिकाणी मगर किंवा मगरीचे पिल्लू निर्दर्शनास आले की प्राणीसंग्रालयातील मगर असल्याचा दावा नागरिक करत असतात (Solapur Sterilization Of 20 Crocodile).

सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या नाल्यात किंवा दलदलीच्या भागात गेल्या काही वर्षांपासून मगरींचा वावर वाढतोय. प्राणी संग्रहालयाच्या परिसरातील नाला, झुडपांच्या जवळील एका डबक्यामध्ये दोन ते अडीच फुटाच्या मगरीचे पिल्लू गेल्या आठवड्यात आढळले. डबक्यामध्ये अढळलेले मगर प्राणी संग्रहालयातील असल्याचा दावा परिसरातल्या नागरिकांनी केला. मात्र, पालिका प्रशासनाने तो दावा फेटाळत प्राणी संग्रहालयातील 20 मगरी असून त्याची नोंदी असल्याचे उद्यान विभागाने स्पष्ट केले आहे.

20 वर्षांपूर्वी प्राणीसंग्रालयात भीमा नदीच्या महापुरात वाहून आलेली एक मगर पकडून आली होती. पण, 12 वर्षांपूर्वी ती मगर मादी असल्याचे तपासणीत स्पष्ट झाल्यानंतर त्याला जोडीदार आणण्याचा निर्णय झाला. त्यानुसार, चेन्नई येथील क्रोकोडाईल बँकेतून तब्बल सात फूट लांबीचा नर जोडीदार आणण्यात आला. त्यानंतर मगरींच्या अड्ड्यांमधून बाहेर पडलेल्या पिल्लांचे स्वागत झाले. पण, नंतर ती संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्यानंतर त्यांचे संवर्धन करणे महापालिकेसाठी डोकेदुखी ठरत असल्याची परिस्थिती आहे.

2012-13 मध्ये पावसाळ्यात प्राणीसंग्रालयातून सात ते आठ मगरींची पिल्लं सांडपाण्याच्या मोरीतून बाहेर पडल्याची चर्चा आहे. 2013 मध्ये एक मगरींचे पिल्लू त्या परिसरातील नाल्यात आढळले होते. दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी देगाव नाल्यात साडेचार ते पाच फूट लांबीची एक मगर वनविभागाने नियुक्त केलेल्या पथकाने पकडली होती. गेल्या आठवड्यात प्राणी संग्रहालयाच्या समोरील नाला, झुडप आणि त्यालगतच्या डबक्यात दोन ते अडीच फुटांची मगर आढळली आहे. त्यामुळे नाल्याच्या परिसरात प्रजोत्पादन क्षमतेच्या मगरींचा वावर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे डोकेदुखी कमी करण्यासाठी पालिकेने मगरीचे नसबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी उद्यान विभागाने मार्गदर्शन मागवले आहे (Solapur Sterilization Of 20 Crocodile).

सध्या प्राणीसंग्रहालयात 20 मगरी आहेत. त्यापैकी तीन नर, एक मादी आणि इतर पिल्लं आहेत. आठ ते नऊ वर्षानंतर मगर प्रजोत्पादन करु शकते, असं अभ्यासकांचं मत आहे. त्यामुळे 12 वर्षांपूर्वी जन्मलेली पिल्लांचे प्रजोत्पादनामुळे आणखी संख्या वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे मगरींची नसबंदी करण्याची निर्णय उद्यान विभागाने घेतला आहे.

Solapur Sterilization Of 20 Crocodile

संबंधित बातम्या :

PHOTO | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला गोरेवाडा प्राणीसंग्रहालय सफारीचा आनंद

Corona : न्यूयॉर्कमध्ये वाघाला कोरोना, कात्रज प्राणीसंग्रहालयात प्रचंड खबरदारी

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.