सोलापूर: एरव्ही वाहतूक पोलीस म्हटलं की समाजाचा बगण्याचा नूर काही और असतो. वाहतूक पोलीस दिसले की अनेक जण रस्ता बदलतात. मात्र, सोलापुरातील वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या माणुसकीमुळं त्यांच कौतुक करण्यात येत आहे. सोलापूरमध्ये सनमाईक घेऊन जाणाऱ्या ट्रकचा पाटा तुटला आणि 20 लाख रुपयांच सनमाईक रस्त्यावर पडले. हे सनमाईक पोलिसांनी स्वत: बाजूला करत ट्रक चालकाला धीर दिला. (Solapur Traffic Police Humanity Story)
सोलापूर शहरातील गुरुनानक चौक येथून एक ट्रक अंदाजे 20 लाख रुपये किमतीचे सनमाईक घेऊन महावीर चौकाकडे जात होता. यामार्गावरून प्रवास करत असताना आधी ट्रकचा पाटा तुटला आणि त्यामुळे ट्रकची बॉडी तुटली.यामुळे चालक तिहेरी संकटात सापडला. पाटा आणि बॉडी तुटल्यानं ट्रक एका बाजू पूर्णपणे वाकल्यामुळे भरगच्च भरलेले सनमाईक रस्त्यावर पडले. त्याची किंमत 20 लाख असल्यानं चालकाला सनमाईकचं नुकसान होते की काय अशी भिती वाटत होती.
पोलिसांनी चालकाला दिला धीर
ट्रकचा पाटा तुटल्याने अपघात झाला या अपघातात ट्रक मधील असलेले सनमाईक पूर्णपणे रस्तावर पडल्याने रस्ता पूर्ण बंद झाला. अचानक 10 ते 12 टनाचा तब्बल 20 लाखांचा माल रस्यावर आल्याने चालकाची भंबेरी उडाली होती. मात्र, ही गोष्ट शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना कळाल्यानंतर पोलिसांनी तत्परता दाखवली. वाहतूक शाखेच्या पोलिसानी संकटात सापडलेल्या चालकाला धीर दिला. गाडीतून बाहेर पडलेल्या मालाचे नुकसान होणार नाही याची ग्वाही दिली आणि स्वत:हून सनमाईक सुरक्षित ठिकाणी ठेवले. (Solapur Traffic Police Humanity Story)
पोलिसांनी या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली. त्यानंतर रस्त्यावर पडलेले 20 लाखांचे सनमाईक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बाजूला काढून ठेवून रस्ता पूर्णपणे मोकळा करून दिला. त्यामुळे शहर वाहतूक पोलिसांचे कौतुक होत आहे. तामिळनाडूहून सोलापूरला सनमाईक आणले जात होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव भोसले, पोलीस उपनिरीक्षक अमित करपे , पोलीस काँन्स्टेबल सचिन कुलकर्णी, अफरोझ मुलाणी, शैलजा पोतदार यांनी सनमाईक सुरक्षित ठिकाणी ठेवले.
वर्ध्यात बसस्थानकावर घोळक्यातून मोबाईल चोरणाऱ्या महिलेला अटक, 41 हजारांचे मोबाईल जप्तhttps://t.co/2M8e6owLWg@WardhaPolice #Wardha #Crime
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 17, 2021
संबंधित बातम्या :
सोलापूरमधून मुंबईला येणारे तीन कोटी रुपयांचे सोने जप्त, चालकाच्या सीटमुळे संपूर्ण प्रकार उघडकीस
रेखा जरे हत्याकांड: फरार बोठेची माहिती द्या; पोलिसांचं नागरिकांना आवाहन
(Solapur Traffic Police Humanity Story)