एक बातमी, ज्यात कसलंच राजकारण नाही, सोलापुरात चालत्या बसमध्ये महिलेची प्रसुती

प्रसंगावधान राखत बस चालकाने तात्काळ एसटी रुग्णालयाकडे वळवली आणि महिलेला उपचारासाठी दाखल केले.

एक बातमी, ज्यात कसलंच राजकारण नाही, सोलापुरात चालत्या बसमध्ये महिलेची प्रसुती
Follow us
| Updated on: Dec 19, 2020 | 3:40 PM

सोलापूर : एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेली बसमध्येच प्रसुती झाल्याची घटना सोलापुरात घडली (Solapur Woman Gave Birth In ST Bus). ही एसटी कर्नाटकातील कलबुर्गी येथून सोलापूर जात होती. यावेळी प्रवासादरम्यान, एका 27 वर्षीय महिलेची प्रसुती झाली. घटनेचे गांभीर्य ओळखत आणि प्रसंगावधान राखत बस चालकाने तात्काळ एसटी रुग्णालयाकडे वळवली आणि महिलेला उपचारासाठी दाखल केले. कमलाबाई परशुराम बाके असं या महिलेचं नाव असून बाके या दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी गावच्या रहिवाशी आहेत (Solapur Woman Gave Birth In ST Bus).

कमलाबाई परशुराम बाके या गरोदर होत्या. त्यांना त्रास होत असल्याने त्या वागदरी येथे अक्कलकोटला जाण्यासाठी बस स्थानकावर थांबल्या होत्या. दरम्यान, कलबुर्गी-सोलापूर ही एसटीबस अक्कलकोट मार्गे सोलापूरला निघाली. बस मधुन बाके या अक्कलकोटकडे निघाल्या असता वागदरी बस स्थानकावरुन पाच किलोमीटरच्या अंतरावर येताच कमलाबाई बाके यांना प्रसुती वेदना सुरु झाल्या.

यावेळी बसमधील महिलांच्या मदतीने त्यांची प्रसुती करण्यात आली. दरम्यान, इकडे प्रसुती झाल्यानंतर बसमधील एका प्रवाशाने अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात फोन करुन या संदर्भातली संपूर्ण माहिती कळवली. तर, बस चालकाने अक्कलकोट बस स्थानकात बस घेऊन न जाता माणुसकीचं दर्शन घडवत बस थेट ग्रामीण रुग्णालयाकडे वळवली.

ग्रामीण रुग्णालयासमोर एसटी उभी करुन प्रवाशांच्या मदतीने कमलाबाई बाके यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या, अक्कलकोट रुग्णालयात कमलाबाई बाके यांच्यावर उपचार सुरु असून आई आणि बाळ दोघांची प्रकृती चांगली आहे.

Solapur Woman Gave Birth In ST Bus

संबंधित बातम्या :

मिरारोडमध्ये नायजेरियन महिलेची रस्त्यावर प्रसुती, ऑटोरिक्षात संसार

प्रसुतीनंतर 20 वर्षीय कोरोनाग्रस्त मातेचा अखेरचा श्वास, बाळ सुरक्षित

महापालिकेच्या नायर कोविड रुग्णालयात त्रिशतक, 300 व्या कोरोनाबाधित मातेची सुखरुप प्रसूती

Vanity Salon | सलूनची चिंता सोडा, आता व्हॅनिटी सलून तुमच्या दारी

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.