पिंपरीत तरुणाची दादागिरी, भररस्त्यात 23 वर्षीय तरुणीची कॉलर पकडली

पुणे : कारला धडक दिल्याच्या रागातून तरुणाने चक्क तरुणीची कॉलर पकडून अश्लील शिवीगाळ केल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडलाय. विशेष म्हणजे या तरुणाला त्याच्या आईनेही साथ दिल्याचं बोललं जातंय. तरुणीला आणि तिच्या बहिणीला शिवीगाळ करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. तसेच दोघींना ‘पाहून घेतो’ म्हणून धमकीही दिली. याप्रकरणी स्वरुपा लोढा आणि मुलगा दर्शन लोढावर गुन्हा दाखल […]

पिंपरीत तरुणाची दादागिरी, भररस्त्यात 23 वर्षीय तरुणीची कॉलर पकडली
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:55 PM

पुणे : कारला धडक दिल्याच्या रागातून तरुणाने चक्क तरुणीची कॉलर पकडून अश्लील शिवीगाळ केल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडलाय. विशेष म्हणजे या तरुणाला त्याच्या आईनेही साथ दिल्याचं बोललं जातंय. तरुणीला आणि तिच्या बहिणीला शिवीगाळ करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. तसेच दोघींना ‘पाहून घेतो’ म्हणून धमकीही दिली. याप्रकरणी स्वरुपा लोढा आणि मुलगा दर्शन लोढावर गुन्हा दाखल करण्यात आला असून 23 वर्षीय तरुणीने चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

दर्शन लोढा याने चारचाकी गाडीला धडक दिली असं म्हणून पीडित फिर्यादीच्या गाडीची चावी काढून घेतली. चावी घेतल्याची फिर्यादी यांनी विचारणा केली असता दर्शन लोढा याने अश्लील शिवीगाळ केली. तुझ्या सारख्या मुली खूप पहिल्या आहेत, असं म्हणत फिर्यादी तरुणीच्या कॉलरला पकडून जवळ ओढून घेत हाताला हिसका दिला.

तेवढ्यात दर्शन लोढा याची आई स्वरुपा यांनी तरुणीला आणि त्यांच्या बहिणीला अश्लील शिवीगाळ केली आणि आम्ही कायदा ओळखतो, आमचे पोलीस ठाण्यात आणि कोर्टात रोजचे येणं जाणं आहे, तू आमच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करशील, त्या पलीकडे काय करणार, तेव्हा आम्ही दोघे तुला बघून घेऊ, अशी धमकी फिर्यादी यांना दिली.

घटनेनंतर स्वरूपा यांनी तक्रारदार तरुणीचा रस्ताही अडवला. यानुसार चिंचवड पोलीस अधिक तपास करत असून आई आणि मुलाला अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपीची रवानगी येरवडा तुरुंगात झाली.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.