Parth pawar | पार्थ पवारांसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची शिवसेनेकडे विशेष मागणी ; सोशल मीडियापोस्ट व्हायरल

| Updated on: Mar 21, 2022 | 4:28 PM

आता पार्थ अजित पवार यांना लोकसभेत पाठवून पवार आणि ठाकरे कुटुंबाच्या पुढच्या पिढीला एकत्र काम करण्याची संधी मिळावी. नुकतेच लोकसभेत बोलत असताना  सुप्रियाताई सुळे यांनी कर्नाटकच्या खासदाराला खडेबोल सुनावले की, कुणाचे आईबाप काढू नये.

Parth pawar | पार्थ पवारांसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची शिवसेनेकडे विशेष मागणी ; सोशल मीडियापोस्ट व्हायरल
उद्धव ठाकरे
Follow us on

 पुणे – राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे वारे सर्वत्र वाहत आहे. या निवडणुका लक्षात घेत राजकीय हालाचालीनाही वेगा आला आहे. यासगळ्या मध्ये राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांचे चिरंजीव पार्थ अजित पवार यांच्यासाठी शिवसेनेने मावळ मतदारसंघ (Maval constituency)राष्ट्रवादीला द्यावा. अशी मागणी कार्यकर्त्याने केली आहे. पार्थ पवार यांना वाढ दिवसाच्या शुभेच्छा देताना त्याने ही पोस्ट लिहिली आहे. कार्यकर्त्याची ही पोस्ट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. २०१९ची लोकसभा पार्थ पवार यांनी मावळ मधून लढवली होती. मात्र त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र त्यानंतर मावळबाबतच्या विविध घटनानावर पार्थ पवार आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम भाष्य करत असतानाही दिसतात.

काय आहे कार्यकर्त्याची मागणी

मला पार्थ अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक वेगळी मागणी महाविकास आघाडी सरकारकडे करायची आहे. ज्याप्रमाणे युवानेते, राज्याचे पर्यटन मंत्री आदित्यजी ठाकरे साहेबांना वरळीमधून उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या कामाचा आवाका आज महाराष्ट्र पाहतोय. त्याप्रमाणे पार्थदादांनाही एक फेअर चान्स मिळाला पाहीजे. मावळचे माननीय खासदार श्रीरंग बारणे हे संसदरत्न खासदार आहेत. त्यांच्या कामाची चुणूक आपण सर्वांनीच पाहिली आहे. महाविकास आघाडीने ठरविल्याप्रमाणे पुढील निवडणूक आघाडी लढणार आहे. त्यामुळे मावळची जागा ही पार्थ अजित पवार यांना देऊन बारणे यांना महाविकास आघाडीने राज्यसभेत पाठवावे. २००५ साली जेव्हा सन्माननीय सुप्रीयाताई राज्यसभेसाठी उभ्या राहिल्या होत्या, तेव्हा हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेबांनी सुप्रियाताईंना बिनशर्त पाठिंबा दिला होता. आज तोच दिलदारपणा माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी दाखवावा, असे माझ्या सारख्या एका सामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला वाटते.असे नितिन हिंदुराव देशमुख यांनी म्हटले आहे. नितीन हे मुंबईमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

 

पवार साहेबांचा नातू खासदार बनला तर

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे मुख्यमंत्री  उद्धवजी ठाकरे साहेब यांची प्रकृती लक्षात घेता कोणतीही तक्रार न करता राज्याचा कारभार हाकत आहेत. त्यांच्यासोबत आदित्यजी ठाकरे देखील उत्तम काम करत आहेत. आता पार्थ अजित पवार यांना लोकसभेत पाठवून पवार आणि ठाकरे कुटुंबाच्या पुढच्या पिढीला एकत्र काम करण्याची संधी मिळावी. नुकतेच लोकसभेत बोलत असताना  सुप्रियाताई सुळे यांनी कर्नाटकच्या खासदाराला खडेबोल सुनावले की, कुणाचे आईबाप काढू नये. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झालेला चालतो, त्याप्रमाणे जर आदरणीय शरद पवार साहेबांचा नातू खासदार बनला तर त्यात वावगे काहीच नाही.