चित्रपटगृह आणि नाट्यगृह 50 टक्के क्षमतेनं सुरु करा, राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक सेलची मागणी

राज्यातील चित्रपटगृह आणि नाट्यगृह पुन्हा एकदा 50 टक्के क्षमतेनं सुरु करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभाग सेलनं केली आहे.

चित्रपटगृह आणि नाट्यगृह 50 टक्के क्षमतेनं सुरु करा, राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक सेलची मागणी
Cinema hall
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 4:06 PM

पुणे : कोरोनाची पहिली लाट काहीशी ओसरल्यानंतर 50 टक्के क्षमतेनं सुरु करण्यात आलेले चित्रपटगृह आणि नाट्यगृह दुसऱ्या लाटेमुळं पुन्हा बंद करण्यात आली. त्यामुळे या क्षेत्रातील मंडळींचं प्रचंड मोठं नुकसान होत आहे. आता कोरोनाची दुसरी लाटही काहीशी ओसरताना पाहायला मिळतेय. अशावेळी राज्यातील चित्रपटगृह आणि नाट्यगृह पुन्हा एकदा 50 टक्के क्षमतेनं सुरु करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभाग सेलनं केली आहे. तसं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांना लिहिण्यात आलंय. (NCP Cultural Department demand’s for cinemas and theaters)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत चित्रपटगृह, नाट्यगृह बंद आहेत. चित्रकरणावरही बंद आणण्यात आली आहे. त्यामुळे कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. 50 टक्के क्षमतेनं कार्यक्रमांसाठी परवानगी दिल्यास या कलाकारांना थोडं अर्थसहाय्य मिळेल, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाकडून करण्यात आली आहे. सर्व कलाकार कोरोनाचे नियम पाळण्यास तयार आहेत. अनेक शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे सरकारने चित्रपटगृह आणि नाट्यगृहांना 50 टक्के क्षमतेनं परवानगी द्यावी, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केलंय.

मुख्यमंत्र्यांकडून राज्यात चित्रीकरणाला तत्त्वत: मान्यता

लॉकडाऊनमुळे राज्यात कुठल्याही प्रकारच्या चित्रिकरणावर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्याबाबत 20 मे रोजी मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे गाऱ्हाणं मांडलं. या चर्चेनंतर राज ठाकरे यांनी लगेचच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. मराठी मनोरंजन क्षेत्रासमोर अनेक समस्या आहेत, पण सध्या राज्यात चित्रीकरण पुन्हा सुरु होणं हे महत्त्वाचं आहे. टीव्ही मालिकांचं चित्रीकरण इतर राज्यात सुरु आहे, असं मत राज यांनी मांडलं. त्यानंतर मालिका निर्माते आणि वाहिन्यांचे प्रमुख यांनी कडक निर्बंध पाळून, बायो बबलमध्ये चित्रीकरण कसं करणार यासंदर्भातला प्रस्ताव दिल्यास त्यांना मंजुरी देता येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक परिसरातच चित्रीकरणासाठी परवानगीची शक्यता

सध्या मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकच्या आसपासच्या परिसरातच चित्रीकरणासाठी परवानगी मिळू शकेल, राज्यातील इतर भागात कोरोना संक्रमणाचं प्रमाण गंभीर आहे, त्यामुळे तिथे लगेचच चित्रीकरणासाठी परवानगी मिळणं कठीण आहे, असंही राज ठाकरे यांनी या बैठकीत स्पष्ट केलं. मनोरंजन क्षेत्राला सध्या भेडसावणाऱ्या इतर गंभीर समस्यांबद्दलही सरकारी यंत्रणेसोबत पाठपुरावा सुरु राहील, असं आश्वासनही राज ठाकरे यांनी दिलं आहे.

संबंधित बातम्या :

मांजरेकर, दामले, कोठारेंसह 50 दिग्गज कलाकारांशी चर्चा, राज ठाकरे म्हणाले, तुमच्या समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत नेतो

महेश भट, सुबोध भावे ते अमोल कोल्हे, मुख्यमंत्र्यांशी संवादात टीव्ही-चित्रपट निर्मात्यांचा महत्त्वाचा निर्णय

NCP Cultural Department demand’s for cinemas and theaters

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.