Pune crime : पोल्ट्री फार्मच्या नावाखाली सुरू होता बनावट दारूचा कारखाना, दोघांना ठोकल्या बेड्या

दौंड (Daund) तालुक्यातील जिरेगावच्या हद्दीत पोल्ट्री फार्मच्या (Poultry farm) नावाखाली सुरू असलेला बनावट दारू (Liquor) बनविण्याचा कारखाना राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या (State Excise Department) कारवाईत उघड झाला आहे.

Pune crime : पोल्ट्री फार्मच्या नावाखाली सुरू होता बनावट दारूचा कारखाना, दोघांना ठोकल्या बेड्या
बनावट दारू कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाकडून छापाImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 12:53 PM

पुणे : जिल्ह्यातील दौंड (Daund) तालुक्यातील जिरेगावच्या हद्दीत पोल्ट्री फार्मच्या (Poultry farm) नावाखाली सुरू असलेला बनावट दारू (Liquor) बनविण्याचा कारखाना राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या (State Excise Department) कारवाईत उघड झाला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे. उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी संतोष झगडे यांनी सांगितले, की कर्मचाऱ्यांना मिळालेल्या खबरीनुसार कानगावच्या हद्दीत वाहनांच्या तपासणीस सुरुवात केली. त्यावेळी एका वाहनाच्या तपासणीत बनावट देशी दारूच्या 144 सीलबंद बाटल्या आढळून आल्या. या बाटल्या कुठून आणल्या, याबाबत वाहनचालकाकडे विचारणा केली असता त्याने जिरेगाव गावाच्या हद्दीत लाळगेवाडी येथील गरदडे यांच्या कुक्कुटपालन पोल्ट्री शेडमधून आणल्याचे सांगितले. त्यानंतर तपासाला सुरुवात करण्यात आली.

बनावट मुद्देमाल

उत्पादन खात्याने पोल्ट्री शेडमध्ये जाऊन पाहणी केली असता, तेथए बनावट दारू करण्याचे साहित्य आढळून आले. तिथे 510 लिटर मद्यार्क, बनावट विदेशी मद्य 36.72 ब. लि., बनावट देशी दारू 69.12 ब. लि. आणि दोन बॉटल सिलिंग असा मुद्देमाल सापडून आला.

3 दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी

उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी या पोल्ट्री शेडमध्ये जाऊन पाहणी केली असता तिथे बनावट दारू तयार करण्याचा कारखाना असल्याचे उघड झाले. बनावट दारू बनविण्याचे साहित्य आढळून आले. बनावट देशी-विदेशी मद्य तयार करण्याचा एकूण रु. 2 लाख 88 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. या दोघांनाही 3 दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

आणखी वाचा :

Pune crime : कुख्यात गुंड गजानन मारणेच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा, अश्लील व्हिडिओ काढून धमकीही दिली?

Pimpri-Chinchwad crime| पिंपरीत नळावरचा ‘राडा’ थेट पोहचला पोलीस स्टेशनात ; जातीवाचक शिव्या अन…

2 कोटीची पाणीपट्टी थकीत ; पुण्यात राष्ट्रीय स्मारकआगाखान पॅलेसचे नळ कनेक्शन महापालिकेने तोडले ; हजारो झाडे सुकली

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.