पुणे : जिल्ह्यातील दौंड (Daund) तालुक्यातील जिरेगावच्या हद्दीत पोल्ट्री फार्मच्या (Poultry farm) नावाखाली सुरू असलेला बनावट दारू (Liquor) बनविण्याचा कारखाना राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या (State Excise Department) कारवाईत उघड झाला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे. उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी संतोष झगडे यांनी सांगितले, की कर्मचाऱ्यांना मिळालेल्या खबरीनुसार कानगावच्या हद्दीत वाहनांच्या तपासणीस सुरुवात केली. त्यावेळी एका वाहनाच्या तपासणीत बनावट देशी दारूच्या 144 सीलबंद बाटल्या आढळून आल्या. या बाटल्या कुठून आणल्या, याबाबत वाहनचालकाकडे विचारणा केली असता त्याने जिरेगाव गावाच्या हद्दीत लाळगेवाडी येथील गरदडे यांच्या कुक्कुटपालन पोल्ट्री शेडमधून आणल्याचे सांगितले. त्यानंतर तपासाला सुरुवात करण्यात आली.
उत्पादन खात्याने पोल्ट्री शेडमध्ये जाऊन पाहणी केली असता, तेथए बनावट दारू करण्याचे साहित्य आढळून आले. तिथे 510 लिटर मद्यार्क, बनावट विदेशी मद्य 36.72 ब. लि., बनावट देशी दारू 69.12 ब. लि. आणि दोन बॉटल सिलिंग असा मुद्देमाल सापडून आला.
उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी या पोल्ट्री शेडमध्ये जाऊन पाहणी केली असता तिथे बनावट दारू तयार करण्याचा कारखाना असल्याचे उघड झाले. बनावट दारू बनविण्याचे साहित्य आढळून आले. बनावट देशी-विदेशी मद्य तयार करण्याचा एकूण रु. 2 लाख 88 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. या दोघांनाही 3 दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
Pune crime : पोल्ट्री फार्मच्या नावाखाली सुरू होता बनावट दारूचा कारखाना, दोघांना ठोकल्या बेड्या
पाहा व्हिडिओ – #Pune #excise #liquor #crime #Video #MaharashtraNews
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmH04UAs pic.twitter.com/VciOyiXfmR— TV9 Marathi (@TV9Marathi) March 23, 2022