Ravindra Dhangekar : हे तर उडतं पुणे; पब बंद होणार नसतील तर मी कुणाची माफी मागणार नाही, रवींद्र धंगेकारांची रोखठोक भूमिका

पुण्यातील पोर्श कारने दोन अभियंत्यांना चिरडल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. याविरोधात रवींद्र धंगेकर यांनी मोठा आवाज उठवला. आता याप्रकरणात पोलिसांवर अजूनही दबाव असल्याचा आरोप धंगेकर यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

Ravindra Dhangekar : हे तर उडतं पुणे; पब बंद होणार नसतील तर मी कुणाची माफी मागणार नाही, रवींद्र धंगेकारांची रोखठोक भूमिका
रवींद्र धंगेकरांचा पुन्हा आरोप
Follow us
| Updated on: May 31, 2024 | 4:22 PM

पुण्यातील पोर्श कारने दोन अभियंत्यांना चिरडले होते. श्रीमंत बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली होती. त्यावेळी रवींद्र धंगेकरांनी विरोध केला. माध्यमांनी हे प्रकरण लावून धरेल. त्याचा मोठा परिणाम दिसून आला. पोलिसांनी चांगला तपास केला आहे पण अजूनही हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप धंगेकरांनी केला आहे. अर्थात त्यांचा इशारा कुणावर हे वेगळं सांगायला नको.

पब संस्कृती थांबवा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यात काळिमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. उडता पंजाब सारखं उडतं पुणे किंवा उडता महाराष्ट्र म्हणायची वेळ आली आहे. लोकशाही पद्धतीने मी रस्त्यावर आलो, पब संस्कृती थांबली पाहिजे ही भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुण्यामध्ये देशभरातील सर्व शहरातून मुलं शिकण्यासाठी येत आहेत. इतर देशातील शहरातून येणाऱ्या मुलांच्या पालकांचे फोन येत आहेत. पुण्यातील नागरिक गप्प बसणार नाही हे लक्षात आल्यावर दोन पोलीस निलंबित केल्याचे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

तर मग कुणाची माफी मागणार नाही

रक्त फेकून देण्यापर्यंतचा अपराध लॅबमधील डॉक्टरांनी केला.पोलिसांनी चांगला तपास केला आहे पण अजूनही हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे.पैसे टाकून सिस्टीम विकत घेऊ शकतो ही त्या श्रीमंतांची भूमिका होती. आम्ही मंत्र्यांवर टिका केल्यानंतर माझा राग आला. मी हसन मुश्रीफ यांची माफी मागतो पण पुण्यातील पब संस्कृती बंद केली पाहिजे. पब बंद होणार नसतील तर मी कुणाची माफी मागणार नाही. मी कुणाला घाबरत नाही, नोटीस द्या नाहीतर आणखी काही करा, अशी रोखठोक भूमिका त्यांनी घेतली.

मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन

हसन मुश्रीफ यांच्या काळात डॉक्टर कसे वागतात हे त्यांना माहिती आहे. काळे याला बाजूला करून आपल्या मनाचा अधिकारी त्याठिकाणी आणला जातोय का अशी शंका येत आहे. पुण्यात येणाऱ्या प्रत्येक मुलाच्या संरक्षणासाठी मी रस्त्यावर उतरणार आहे. लोकसभेचा निकाल लागल्यानंतर मी पुन्हा रस्त्यावर उतरणार आहे. मला नोटीस पाठवण्यापेक्षा चुकीच्या गोष्टी बंद करा. मी मंत्र्यांच्या मतदारसंघात, मंत्र्यांच्या घरासमोर जाऊन माझं म्हणणं मांडणार आहे माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा करून पैसे मागितले तर माझ्याकडे पैसे नाही मी जेलमध्ये जाईन, असे धंगेकर म्हणाले.

4 तारखेनंतर मी विधानसभेत नसेन तर लोकसभेत असेन

यावेळी धंगेकरांनी सत्ताधाऱ्यांना डिवचले. 4 तारखेनंतर मी विधानसभेत नसेन तर लोकसभेत असेन असा दावा त्यांनी केला. ललित पाटील प्रकरणी देखील मी हसन मुश्रीफ यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याचे ते म्हणाले. सत्तेपायी वडिलांसारख्या शरद पवार यांना सोडून जाणाऱ्या मुश्रीफ यांनी धमकी देऊ नये, असा इशारा त्यांनी दिला. तानाजी सावंत हा भ्रष्टाचारी माणूस आहे, असा आरोप त्यांनी केला.

Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.