PMC | पुणे महापालिकेचा अजब कारभार अनाधिकृत कामावर कारवाई ; मात्र अनधिकृत फ्लेक्सबाजीकडे दुर्लक्ष
कारवाई करताना पालिकेचे कर्मचारी पत्राशेड, भिंती तोडून टाकतात. पथारी तसेच विक्रेत्यांचे साहित्य जप्त करतात. मात्र, अनधिकृत बोर्ड अथवा फ्लेक्स लावलेला असल्यास केवळ फ्लेक्स काढताना दिसून आले आहे . मात्र याप्रकारचे सांगाडे राहिल्याने अपघात होण्याची भीती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली आहे.
पुणे – शहरातील महापालिकेवर प्रशासकाच्या कार्यकाळ सुरु झाला आहे. या काळात शहरातील अनधिकृत बांधकामावर (Unauthorized construction)कारवाईचा बडगा महापालिकेने उचला आहे. मात्र दुसरीकडे शहरातील अनधिकृत फ्लेक्सबाजीला (Unauthorized Flexus) महापालिकाच खतपाणी घालत असल्याचे दिसून आले आहे. चित्र आहे. महापालिकेकडून (PMC) अतिक्रमण काढताना केवळ रस्त्यावर लावलेल्या मोठमोठया बॅनरचे, फ्लेक्स काढले जात असून बांबूचा सांगाडा मात्र पुन्हा नव्याने जाहीराती लावण्यासाठी तसाच ठेवला जात आहे. कारवाई करताना पालिकेचे कर्मचारी पत्राशेड, भिंती तोडून टाकतात. पथारी तसेच विक्रेत्यांचे साहित्य जप्त करतात. मात्र, अनधिकृत बोर्ड अथवा फ्लेक्स लावलेला असल्यास केवळ फ्लेक्स काढताना दिसून आले आहे . मात्र याप्रकारचे सांगाडे राहिल्याने अपघात होण्याची भीती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली आहे
अपघात होण्याची भीती
आयुक्तांनी शहरातील अतिक्रमणे, पदपथवरील फ्लेक्स, बोर्ड बॅनर्स, साईड मार्जिंन मधील बांधकामे काढण्याचे आदेश दिले आहे. अतिक्रमण विभागाने कारवाईसाठी पुढाकार घेतलाआहे मात्र कारवाई केवळ अनधिकृत बांधकामावरच केले जात आहे. कारवाई करताना पालिकेचे कर्मचारी पत्राशेड, भिंती तोडून टाकतात. पथारी तसेच विक्रेत्यांचे साहित्य जप्त करतात. मात्र, अनधिकृत बोर्ड अथवा फ्लेक्स लावलेला असल्यास केवळ फ्लेक्स काढताना दिसून आले आहे . मात्र याप्रकारचे सांगाडे राहिल्याने अपघात होण्याची भीती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली आहे. जाहिराती करणाऱ्या अनेक सांगाडयांना लोखंडी ग्रीलचा सपोर्ट द्यावा लागतो. तसेच त्याला मोठया लोखंडी शिडयाही असताता. हे सांगाडे उभारताना त्याचे कोणतेही स्ट्रक्चल ऑडिट होत नाही. त्यामुळे, हे सांगाडयांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
Pune Crime : घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचे चाकण पोलिस ठाण्यातून पलायन