Pune PMC | पुणे महापालिकेचा आडमुठेपणा ; व्यापाऱ्यांपुढे जगावे की मरावे हा प्रश्न , प्रकरण काय?
गेल्या दोन वर्षांपासून मंडईत मेट्रोचे काम सुरू आहे. त्याचा परिणाम मंडईतील व्यापारावर झाला आहे. तसेच करोनामुळे दोन वर्षात फारसा व्यापारही झालेला नाही. महापालिकेकडून काही व्यापाऱ्यांना 7 ते 8 लाख रुपये भरण्याची नोटीस आली आहे. महिन्याचा व्यवसायसुद्धा पालिकेच्या नवीन भाडे एवढा होत नाही.
पुणे – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर (Corona third Waves) आता शहरातील स्थिती पूर्वपदावर येत आहे. शहरातील बाजारपेठाही पूर्ववत झाल्या आहेत. हे सगळं सुरु असताना महापालिकेचा (Municipal Corporation)करंटेपणा समोर आला आहे. महात्मा फुले मंडई महापालिकेनं 200 पट भाडेवाढ केली आहे. महापालिकेनं केलेल्या या अजब भाडेवाडीमुळे व्यापाऱ्यांपुढे जगावे की मरावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील महात्मा फुले मंडईमधील(Mahatma Phule Mandai) व्यापाऱ्यांसाठी महानगरपालिकेने ही भाडेवाढ केली आहे. महापालिकेच्या या निर्णयाला मंडईतील व्यापारी संघटनेने तीव्र विरोध केला आहे. महापालिकेनं ही भाडंवाढ मागे घेतली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा व्यावसायिक संघटने दिला आहे.
महापालिका कर आकारणी
महात्मा फुले भाजीमंडई शहरातील मोठी भाजी मंडई आहे. मंडईत किरकोळ आणि घाऊक व्यापार करणारे सुमारे दोन ते अडीच हजार व्यापारी शेतमालाचा व्यापार करतात.त्यासाठी महापालिकेने महात्मा फुले मंडईत 1500 गाळे भाडे तत्त्वावर व्यावसायीकांसाठी दिले आहेत. त्यातील काही गाळे पक्क्या आणि कच्या स्वरुपाचे आहेत. त्यानुसार त्यांच्याकडून मासिक, सहामाही आणि वार्षिक भाडे घेतले जाते. महापालिकेने भाडेवाढ करण्यापूर्वी 250 पासून ते 900 रुपयांपर्यंत मासिक भाडे होते. मात्र, आता नवीन भाडेवाढ पालिकेच्या जागावाटप नियमावलीनुसार केली असून हे भाडे 7 हजार 668 पासून ते 1 लाख 24 हजार रुपयांवर गेले आहे. तर, महापालिकेने मागील दोन वर्षांपासून नवीन दराने करार केल्याशिवाय भाडेही घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
व्यापार डबघाईला आलाय
गेल्या दोन वर्षांपासून मंडईत मेट्रोचे काम सुरू आहे. त्याचा परिणाम मंडईतील व्यापारावर झाला आहे. तसेच करोनामुळे दोन वर्षात फारसा व्यापारही झालेला नाही. महापालिकेकडून काही व्यापाऱ्यांना 7 ते 8 लाख रुपये भरण्याची नोटीस आली आहे. महिन्याचा व्यवसायसुद्धा पालिकेच्या नवीन भाडे एवढा होत नाही. तर, इतकी रक्कम आम्ही भरायची कशी असा प्रश्न व्यापारी संघटनेकडून विचारला जात आहे.
ED Raid भाजपचे लोक धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत का?, छगन भुजबळांचा सवाल
Sanjay Raut : भाजपकडून यंत्रणेचा वापर करून झूंडशाही, शिवसेना नेते संजय राऊतांचा आरोप