ट्रेकिंगला आलेल्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराने रस्त्यातच मृत्यू ; भोरमधील रायरेश्वर किल्ल्यावरील घटना

नाष्टा झाल्यावर सगळे गाडीत बसण्यासाठी निघाले असताना शुभमला अचानक अस्वस्थ वाटू लागलं, आणि त्यातच त्याला हृदय विकाराचा झटका आला. त्यानंतर शुभमला लगेचचं जवळच्या अंबवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.

ट्रेकिंगला आलेल्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराने रस्त्यातच मृत्यू ; भोरमधील रायरेश्वर किल्ल्यावरील घटना
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 9:24 PM

पुणेः बारामतीहून पुण्यातील भोरमधील रायरेश्वर किल्ल्यावर (Raireshwar Fort) ट्रेकिंगसाठी (Trekking) आले असताना, एका 17 वर्षीय विद्यार्थ्याचा (Student Heart Attack) हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाल्याची घटना घडली. यामध्ये शुभम प्रदीप चोपडे असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो बारामतीतल्या शारदाबाई पवार विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयातले 46 विद्यार्थी आणि 4 शिक्षकांबरोर तो रायरेश्वर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी जात होते, त्यावेळी ही दुर्देवी घटना घडली आहे.

शुभम प्रदीप चोपडे हा विद्यार्थी बारामतीहून पुण्यातील भोरमधील रायरेश्वर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आला होता. यावेळी त्याच्यासोबत बारामतीच्या शारदाबाई पवार विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयातले 46 विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि 4 शिक्षक बरोबर होते. सकाळी 9 वाजता ते भोर-रायरेश्वर मार्गावरील कोर्ले याठिकाणच्या एका हॉटेलवर नाष्टा करण्यासाठी थांबले होते.

विद्यार्थ्याला हृदयविकाराचा झटका

नाष्टा झाल्यावर सगळे गाडीत बसण्यासाठी निघाले असताना शुभमला अचानक अस्वस्थ वाटू लागलं, आणि त्यातच त्याला हृदय विकाराचा झटका आला. त्यानंतर शुभमला लगेचचं जवळच्या अंबवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.

मित्रांना, शिक्षकांना मानसिक धक्का

शुभम हा मूळचा करमाळा तालुक्यातील उंब्रट गावाचा रहिवासी आहे, शिक्षणासाठी तो बारामती येथे राहत होता. शुभमंच्या जाण्याने त्याच्या सोबत असलेल्या त्याच्या मित्रांना आणि शिक्षकांना जबर धक्का बसला आहे. अवघ्या 17 वर्षे वय असणाऱ्या शुभमचा हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जाती.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.