पुण्यात रामटेकडी परीक्षा केंद्रावर विद्यार्थी आणि आयोजकात तुंबळ हाणामारी
करोनाच्या काळात तब्बल दोन हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात एकत्रित जमवून परीक्षा घेण्यात येत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. कोरोनाच्या नियमावलीचे उल्लंघन करत नियम मोडणाऱ्या परीक्षा सेंटरवर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
पुणे- पुण्यातील रामटेकडी येथील परीक्षा सेंटरवर विद्यार्थी व आयोजकांमध्ये मोठा संघर्ष झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सीईटीच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर येण्यास उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांमध्ये सोडण्यात प्रशासनाने अडवणूक केल्याने ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. अद्यापही काही परीक्षार्थी विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाने परीक्षा केंद्रामध बसवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.