Pune | पुण्याला मिळाले नवीन जिल्हाधिकारी, डॉ. राजेंद्र देशमुख यांची बदली!

राज्यातील प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यामध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असलेल्या पाहायला मिळत आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यावर कारवाईला सुरूवात केलेलं पाहायला मिळालं. आता पुण्याला नवे जिल्हाधिकारी मिळाले आहेत.

Pune | पुण्याला मिळाले नवीन जिल्हाधिकारी, डॉ. राजेंद्र देशमुख यांची बदली!
Pune New Collector Suhas Divse
Follow us
| Updated on: Feb 07, 2024 | 8:36 PM

पुणे : विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा खून झाल्यानंतर टोळीयुद्धाचा भडका उडणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र राज्य सरकारने खबरदारी म्हणून मोठी पाऊल उचलली असून अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पदभार दिला आहे. अमितेश कुमार यांनी पुण्यातील सर्व कुख्यात गुंडांना पोलीस आयुक्तालयात बोलवत ओळख परेड घेतलेली पाहायला मिळाली. अशातच आता पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख यांची बदली झाली आहे.

पुण्याच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी सुहास दिवसे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. राजेंद्र देशमुख यांच्या जागी सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुहास दिवसे यांच्या जागी राजेंद्र देशमुख यांची बदली केल गेली आहे. डॉ. राजेंद्र देशमुख यांना तिथला पदभार सोपवून पुणे जिल्हाधिकारीपदाचा पदभार त्वरित स्वीकारण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत.

आगामी निवडणुकांमुळे आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यामधील एकूण 267 गुंडांना बोलावनू घेत त्यांची ओळख परेड घेतली होती. अमितेश कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेतली,  गुडांना सोशल मीडियाचा वापर करत दहशत पसरवू नये. व्हाट्सअॅपला गुन्हगारीचं उदात्तीकरणस होईल असे स्टेटस ठेवाचे नाहीत, नाहीतर कायदेशीर कारवाई होणार असल्याचं सांगितलं.

दरम्यान, इनस्टावर रील टाकत त्यामध्ये कोयते हातात घेऊन, तर पुण्याचा बापsss, सगळी सूत्र इथूनच हलतात असे कॅप्शन लिहित आपल्या टोळीची दहशत वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे पोलिसांनी सर्वांना शेवटची सूचना दिली असून आता थेट कारवाई होणार असल्याचं सांगितलं आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.