PM Narendra Modi | रविवारी शाळेला सुट्टी असते …ओ मोदीसाहेब, असे म्हणत काँग्रेस मोदींवर खोचक टीका
एकीकडे शाळा उघडी नसताना मुलांना शाळेत पाठवलं जात आहे. महाराष्ट्र काँग्रेसने ट्विट करत म्हटलंय की, रविवारी शाळेला सुट्टी असते ओ मोदी साहेब (कधी शाळेत गेले असते तर माहीत असतं) तुमच्या प्रसिद्धी साठी पोरांना कशाला त्रास देत आहात? महाराष्ट्रद्रोही_मोदी_परत_जा असा हॅशटॅगही जोडण्यात आला आहे.
पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या( Prime Minister Narendra Modi) हस्ते नुकतेच पुणे मेट्रोचा (Pune Metro) लोकार्पण सोहळा पार पडला. या लोकार्पणाच्या कार्यक्रमावेळी स्वतः पंतप्रधान मोदी यांनी स्वत: मोबाईलमधून तिकीट काढून मेट्रोनेही प्रवास केला. आनंदनगर ते गरवारे कॉलेज पर्यंतचा मेट्रोचा 5 किमीचा प्रवासात त्यांनी दिव्यांग मुलांशी तसेच शालेय विद्यार्थ्यांच्य सोबतही संवाद साधत त्यांची आस्थेने चौकशी केली. या प्रवास दरम्यान मेट्रोत उपस्थित असलेल्या मुलांनी शलक्षालेल्या गणवेश परिधान केला होता. या मुलांच्या गणवेशासोबत असलेल्या मोदींच्या फोटोवर काँग्रेसने(Congress) आक्षेप नोंदवला आहे. त्यांच्या याच कृतीवर जोरदार टीका होत आहे. तसेच त्यांच्यावर मीम्स देखील व्हायरल होत आहेत
सुट्टीच्या दिवशीच शालेय गणवेशाचा हट्ट
या प्रवासात ज्या विद्यार्थ्यांनी शाळेचा गणवेश परिधान केला आहे. त्यावर आज रविवार असतानाही ही मुले शाळेला का जात आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात असून टीकाही केली जात आहे . एकीकडे शाळा उघडी नसताना मुलांना शाळेत पाठवलं जात आहे. महाराष्ट्र काँग्रेसने ट्विट करत म्हटलंय की, रविवारी शाळेला सुट्टी असते ओ मोदी साहेब (कधी शाळेत गेले असते तर माहीत असतं) तुमच्या प्रसिद्धी साठी पोरांना कशाला त्रास देत आहात? #महाराष्ट्रद्रोही_मोदी_परत_जा असा हॅशटॅगही जोडण्यात आला आहे.
ही इव्हेंटबाजी कश्यासाठी
मेट्रोच्या केवळ अर्धवट कामाचे उदघाटन करून इंव्हेंटबाजी का? मोदीच्या या दौऱ्याच्या निमित्ताने या मार्गावरील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. तर दुसरीकडे त्यांच्या पालकांना दुकाने बंद करायला लावली जात आहेत असा सवाल विचारण्यात येत आहे.
वैराग्य दाखवून बगल में छुरी घेऊन फिरायचं, भाजप नेते गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर सणसणीत टीका!
Health Care Tips : जेवण केल्यानंतर तुम्हीही करता ‘या’ चुका? तर वेळीच सावध व्हा, नाहीतर…