भाजपचे लोक शरद पवारांचा छुपा पाठिंबा घेतायेत; अजित पवार गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप

Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या वेगवान घडामोडी घडत आहेत. अशातच पुण्यात मात्र आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदाराने भाजप आणि शरद पवार यांच्याबाबत महत्वाचं विधान केलंय. वाचा...

भाजपचे लोक शरद पवारांचा छुपा पाठिंबा घेतायेत; अजित पवार गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शरद पवार, अजित पवारImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Oct 20, 2024 | 10:32 AM

राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या पुणे जिल्ह्यातही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. अशातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी भाजप शरद पवारांचा पाठिंबा घेत असल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटून वेगळं समीकरण जुळवायचा प्रयत्न सुरु आहे. शरद पवार यांचा छुपा पाठिंबा घेऊन महाविकास आघाडीचा पुरस्कृत उमेदवार उभा करायचा आहे. हे सर्व देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं आहे. तालुका आणि प्रदेशकार्यकारणी यांच्यात समन्वयक होत नाही. तोपर्यंत माझी उमेदवारी जाहीर करू नका असं म्हटलं आहे, असं सुनील शेळके म्हणालेत.

सुनील शेळके काय म्हणाले?

मावळमध्ये महाविकास आघाडीमधील कुठलाच उमेदवार लढायला तयार नाहीत. राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा घेऊन महाविकास आघाडीतील नेते किंवा घटक पक्ष एकत्र उमेदवार देत आहेत. वेगळी स्टेटर्जी करत आहेत. यामागे काही भाजपचे नेते आहेत, असा गंभीर आरोप सुनील शेळके यांनी केलाय.

भाजप नेत्यांच्या भूमिकेवर आक्षेप

अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना सुनावलं आहे. पक्ष एकसंघ कसा राहील हे भाजपच्या नेत्यांनी पाहावं आमच्यात लुडबुड करून भांडण लावू नये. महायुतीत तेढ निर्माण करण्याच काम भाजपममधील काही पदाधिकारी करत आहेत. मला आनंद आहे की राष्ट्रीय पक्ष काँग्रेस आणि प्रांतिक पक्ष ठाकरेंची शिवसेना, शरद पवार गट स्वतः च चिन्ह घेऊन मावळ विधानसभेत उतरू शकत नाही. याचा अर्थ महायुतीचा उमेदवार विजयी होणार आहे, असं आमदार सुनील शेळके यांनी म्हटलं आहे.

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आल्यानंतर फोनद्वारे त्यांच्याशी संवाद झाला. अजित पवारांना समक्ष भेटलो आहे. भाजपमधील पदाधिकारी कार्यकर्त्यांची दिशाभूल करत आहेत. जाणीवपूर्वक महायुतीत तेढ निर्माण करण्याची रणनीती आखत आहेत. भाजपमधील नेत्यांनी त्यांचा पक्ष एक संघ कसा ठेवता येईल हे पाहावं. आमच्याकडे येऊन लुडबुड करायची आणि भांडण लावायचे हे उपद्व्याप करू नयेत, असं शेळके म्हणालेत.

Non Stop LIVE Update
मुंबईत एकाच घरात 2 भावांना उमेदवारी, भाजपकडून 99 जणांची पहिली यादी
मुंबईत एकाच घरात 2 भावांना उमेदवारी, भाजपकडून 99 जणांची पहिली यादी.
'अयोध्येच्या निकालावेळी देवापुढे बसलो अन्...',सरन्यायाधीश काय म्हणाले
'अयोध्येच्या निकालावेळी देवापुढे बसलो अन्...',सरन्यायाधीश काय म्हणाले.
भाजपच्या पहिल्याच यादीत या 99 उमेदवारांना वर्णी, बघा कोणाला संधी
भाजपच्या पहिल्याच यादीत या 99 उमेदवारांना वर्णी, बघा कोणाला संधी.
मनोज जरांगे पाटील अॅक्शन मोडमध्ये, मराठ्यांचे उमेदवार कुठे देणार?
मनोज जरांगे पाटील अॅक्शन मोडमध्ये, मराठ्यांचे उमेदवार कुठे देणार?.
काँग्रेस आणि ठाकरे गटातील वाद मिटणार? शरद पवार करणार मध्यस्थी?
काँग्रेस आणि ठाकरे गटातील वाद मिटणार? शरद पवार करणार मध्यस्थी?.
मनोज जरांगे पाटलांचा निर्धार, 'बदला घेणारच…आम्ही संपवणार म्हणजे...
मनोज जरांगे पाटलांचा निर्धार, 'बदला घेणारच…आम्ही संपवणार म्हणजे....
कुडाळच्या जागेवर राणे धनुष्यबाण चिन्हावर लढणार?लवकरच शिंदे गटात प्रवेश
कुडाळच्या जागेवर राणे धनुष्यबाण चिन्हावर लढणार?लवकरच शिंदे गटात प्रवेश.
शिवडीमध्ये कोणाची मशाल धगधगणार? समर्थकांमध्ये रंगतंय पोस्टर वॉर
शिवडीमध्ये कोणाची मशाल धगधगणार? समर्थकांमध्ये रंगतंय पोस्टर वॉर.
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, अन्...
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, अन्....
मनोज जरांगेंनी घेतली मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्त्यांची भेट
मनोज जरांगेंनी घेतली मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्त्यांची भेट.