Supriya Sule : किती हल्ले झाले, मात्र मुख्यमंत्र्यांनी शब्दही काढला नाही, त्यांच्या सुसंस्कृतपणाचा अभिमान; सुप्रिया सुळेंकडून कौतुक
पुरोगामी महाराष्ट्रात हनुमान चालिसाच्या (Hanuman Chalisa) प्रश्नाने सर्वसामान्यांचे विषय सुटणार आहेत का, असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे. सध्या राज्यात हनुमान चालिसा आणि अजानवरून वादंग सुरू आहे. यावर त्यांना विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिला आहे.
पुणे : माझ्या लोकसभा मतदारसंघाच्या जबाबदाऱ्या, महागाई आणि कोविडचे आव्हान आहे. एवढे मोठे प्रश्न सोडून, बाकीच्या विषयांची मला फारशी माहिती नसते. पुरोगामी महाराष्ट्रात हनुमान चालिसाच्या (Hanuman Chalisa) प्रश्नाने सर्वसामान्यांचे विषय सुटणार आहेत का, असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे. सध्या राज्यात हनुमान चालिसा आणि अजानवरून वादंग सुरू आहे. यावर त्यांना विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिला आहे. मुंबईमध्ये नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा या दाम्पत्यावरून आणि त्यांच्या राजकारणावरून वातावरण तापले आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे हनुमान चालिसावरून वाद सुरू आहे. मात्र अशा राजकारणातून सर्वसामान्यांचे प्रश्न सुटणार आहेत का, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. अशामुळे राज्यातले वातावरण दुषित होत असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत.
‘संविधानाच्या चौकटीत राहावे’
राज्याचे मुख्यमंत्री किती सुसंस्कृत आहेत, त्यांनी एक शब्दही काढला नाही. त्यांनी आपला सुसंस्कृपणा दाखवला. त्यांच्यावर किती हल्ले झाले तरी त्यांनी आपले मराठी आणि भारतीय संस्कार शाबूत ठेवले. याचे मला कौतुक आणि अभिमान वाटतो. लोक त्यांना पाहिजे ते करतात, बोलतात. आपण संविधानाच्या चौकटीत राहिले पाहिजे. आत्मचिंतन सातत्याने केले पाहिजे. लोकांच्या सेवेसाठी मी राजकारणात आले, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राज्यात वादंग
दोन दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर राणा दाम्पत्याचे आंदोलन सुरू आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालिसा वाचण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मातोश्रीबाहेर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांनी याठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. तर राज ठाकरेंच्या हनुमान चालिसा आणि औरंगाबादेतील सभेवरूनही वाद सुरू झाला आहे.